E Scooter : One-Motoनं लॉन्च केलं Electa, एका चार्जिंगमध्ये धावणार 50 किलोमीटर!
इतर देशांतील अनेक मोठ्या ऑटो कंपन्या भारतात त्यांची इलेक्ट्रिक वाहनं लॉन्च करताहेत. प्रीमियम EVचा पहिला ब्रिटीश ब्रँड असलेल्या One-Motoनं EV इंडिया एक्स्पोमध्ये भारतात आपलं नवीन Electa, हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल लॉन्च केली.
इतर देशांतील अनेक मोठ्या ऑटो कंपन्या भारतात त्यांची इलेक्ट्रिक वाहनं लॉन्च करताहेत. प्रीमियम EVचा पहिला ब्रिटीश ब्रँड असलेल्या One-Motoनं EV इंडिया एक्स्पोमध्ये भारतात आपलं नवीन Electa, हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल लॉन्च केली. OneMoto आधीपासून भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये आपल्या पाऊलखुणा विस्तारण्यासाठी ओळखलं जातं. यापूर्वी, कंपनीनं वन-मोटो बोयाका आणि वन-मोटो कम्युटा या टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपली दोन उत्पादनं आणली होती.
प्रीमियम म्हणून स्थान
Electa इलेक्ट्रिक स्कूटरला प्रीमियम म्हणून स्थान देण्यात आलंय. त्याची किंमत ₹2 लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन हायस्पीड ई-स्कूटर तरुणांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलीय. Electa हे सध्या कंपनीचं सर्वात महागडं मॉडेल आहे, Bykaची किंमत ₹ 1.80 लाख आहे, तर Commuta ₹ 1.30 लाख (सर्व किंमती एक्स-शोरूम) या तीनपैकी सर्वात स्वस्त आहे.
कंपनीची भारतातील ही तिसरी ऑफर आहे. नोव्हेंबरमध्ये Comuta आणि Byca लाँच केल्यानंतर Electa ही वन-मोटोची तिसरी हाय-स्पीड स्कूटर आहे. तिन्ही उत्पादनांना वन अॅपसाठी सपोर्ट मिळतो, ज्यात जिओ-फेन्सिंग, आयओटी आणि ब्लूटूथ यासारखी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पण Electaला वेगळे ठेवणारी 72V आणि 45A डिटेचेबल लिथियम-आयन बॅटरी आहे. ती चार तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
One-Moto Electaचे स्पेसिफिकेशन्स परत प्लग इन करण्यापूर्वी, कंपनीचा दावा आहे, की स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज देतं आणि तिचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे. नवीन स्कूटर मॅट ब्लॅक, शायनी ब्लॅक, ब्लू, रेड आणि ग्रे अशा 5 कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलंय. डिस्प्ले अॅनालॉग असताना, Electa दोन्ही चाकांवर हायड्रॉलिक डिस्क ब्रेक आणि पर्यायी क्रोम अपग्रेडसह येतं. मोटर, कंट्रोलर आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटीही आहे.
‘ICE इंजिन वाहन चालवतानाचा अनुभव देऊ इच्छितो’ भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची वाढती मागणी लक्षात घेता, बाजारात आधीच अनेक मोठे स्पर्धक आहेत. वन-मोटो त्यामध्येही एक चांगला स्पर्धक बनण्याची तयारी करत आहे. वन-मोटो इंडियाचे सीईओ शुभंकर चौधरी म्हणाले, “भारत EVचं स्वागत करत आहे. आम्ही दर्जेदार उत्पादनं देण्यावर भर देत आहोत. हाय-स्पीड दर्जाची प्रीमियम उत्पादनं लाँच करण्याचा आणि मोठ्या मेट्रो शहरांमध्ये वितरण सुरू करण्याचा आमचा विचार आहे. आम्ही आमच्या स्कूटरद्वारे भारतीय ग्राहकांना केवळ सेवा देऊ इच्छित नाही, तर त्यांना ICE इंजिन वाहन चालवतानाचा अनुभव देऊ इच्छितो.”