Pure EV : गुजरातमध्ये Pure EV स्कूटरला आग, आगीची पाचवी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुन्हा एकदा इलेक्ट्रीक स्कूटरच्या संदर्भात प्रश्न उपस्थितीत झाले आहेत.

Pure EV : गुजरातमध्ये Pure EV स्कूटरला आग, आगीची पाचवी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
इलेक्ट्रीक स्कूटरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:22 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांत भारतात (India) अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सना (electric scooter) आग लागली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यामध्ये ओला इलेक्ट्रिक (Ola electric), जितेंद्र न्यू ईव्ही, ओकिनावा आणि Pure EVच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. Pure EV ई-स्कूटरची सर्वाधिक प्रकरणं समोर आली आहेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा एका Pure EV इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्यानं हा मुद्दा चर्चेत आहे. यामुळे पुन्हा एकदा इलेक्ट्रीक स्कूटरच्या संदर्भात प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. यासंदर्भात काय कारवाई करताईल, काय काळजी घ्यायला हवी, याची देखील चर्चा होती आहे. गुजरातच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, Pure EV च्या EPluto 7G इलेक्ट्रिक स्कूटरला पाटण, गुजरातमध्ये आग लागली. रिपोर्टनुसार, ही घटना घराबाहेर चार्जिंगसाठी प्लग करताना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्युअर एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.

चालत्या स्कूटरला आग

यापूर्वी प्युअर ईव्हीच्या चार ई-स्कूटरला आग लागली होती. प्युअर ईव्ही ई-स्कूटरला आग लागण्याची चौथी घटना गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये घडली. हैदराबादच्या घटनेत मालकानं सांगितले की, त्याच्या मित्रासोबत प्रवास करत असताना ई-स्कूटर अचानक बंद पडली. बॅटरीचा डबा उघडल्यानंतर धूर निघू लागला आणि अखेर त्याला आग लागली. वृत्तानुसार, ईव्ही मालकानं पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी कुठूनही बॅटरी घेत नाही

Pure EVनं यावर्षी एप्रिलमध्ये 2 हजार इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवल्या आहेत. त्याच्या ETrance+ आणि EPluto 7G ई-स्कूटर्ससाठी रिकॉल जारी करण्यात आलं होतं. यातील EPluto 7G हे तेच मॉडेल आहे. ज्याला अलीकडेच हैदराबाद आणि गुजरातमध्ये आग लागली होती. अहवालानुसार, Pure EV इतर कुठूनही बॅटरी पॅक घेत नाही. अशा प्रकारे आगीच्या घटनांसाठी कंपनी जबाबदार आहे. Pure EV इलेक्ट्रिक स्कूटर्स खरोखरच सुरक्षित आहेत का आणि Pure EV या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करत आहे? हे पाहणे गरजेचं आहे. आतापर्यंत कंपनीकडून या मुद्द्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

EV इलेक्ट्रिक स्कूटर

पण प्रश्न असा पडतो की, खरच प्युअर एनर्जीचा दोष आहे का? किंवा इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी सेल इन्फ्रास्ट्रक्चर चुकीची असल्यास, कारण विविध ब्रँडच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागली किंवा खराब झाल्याची घटना घडली आहे. अनेकांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक वाहनं आणि त्यांच्या बॅटरी विशेषत: बनवल्या पाहिजेत आणि वेगळ्या पद्धतीनं डिझाइन केल्या पाहिजेत कारण भारतीय हवामान खूप गरम आहे. अशा परिस्थितीत, ई-स्कूटरसाठी बराच वेळ उघड्यांवर राहण म्हणजे देखील भविष्यातील समस्याच आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या वाढत्या बाजारपेठेसोबत राहण्यासाठी ही समस्या लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.