AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर, अख्खं मार्केट ‘इलेक्ट्रिक’चं; भारतीयांना हवाय पेट्रोल-डिझेलला पर्याय

ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक (Electric Vehicle) किंवा हायब्रिड वाहनांकडे वाढीस लागला आहे. जगभरातील वाहन धारकांच्या अभ्यास करून डेलॉईटने अहवाल बनविला आहे.

...तर, अख्खं मार्केट ‘इलेक्ट्रिक’चं; भारतीयांना हवाय पेट्रोल-डिझेलला पर्याय
इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढणार
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 9:34 PM
Share

नवी दिल्लीआगामी काळात भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या संख्येत वाढ होऊ शकते असा अंदाज वाहन विषयक अभ्यास करणाऱ्या डेलॉईटने (Deloitte) व्यक्त केला आहे. भारतीयांची वाहनांबद्दल असलेल्या विचारांत बदल झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांत रस दाखविणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक (Electric Vehicle) किंवा हायब्रिड वाहनांकडे वाढीस लागला आहे. जगभरातील वाहन धारकांच्या अभ्यास करून डेलॉईटने अहवाल बनविला आहे. भारतात पर्यावरण-अनुकूल आणि कोविड प्रकोपामुळे सर्वोत्तम वाहतूक साधनांवर अधिक भर दिला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची (CHARGING STATION) उभारणी केल्यास वापराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय प्रदूषणाबाबत चिंतीत

अहवालात 59 टक्के भारतीय ग्राहक प्रदूषणाबाबत चिंतेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल किंवा अन्य इंधनामुळे प्रदूषण पातळीत होत असलेल्या वाढीबद्दल भारतीय ग्राहक चिंतेत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाच्या शोधांत भारतीयांचा कल असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आलं आहे. ग्रीन एनर्जी उपक्रमाअंतर्गत वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थसंकल्पात नुकतीच करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी केल्यास वापराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. डेलॉईट इंडियाचे भारतातील प्रमुख राजीव सिंह यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि नवीन संशोधन नुसार वाहन क्षेत्रात प्रगतीच्या संधी जाणवत आहेत. येत्या काळात भारतात दोन-तीन चाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या संख्येत भर पडेल अशा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.

चार्जिंग स्टेशनचं जाळं:

केंद्र सरकारने देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग पॉईंटस उभारण्याची योजना आखली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या HPC, BPCL आणि IOC देशात 22 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करतील. BPCL देशात 7000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचवेळी, HPCL 5000 आणि IOC एकूण 10,000 EV चार्जिंग स्टेशन उभारेल. अनेक रस्ते आणि मार्केटमध्ये चार्जिंग पॉइंट बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपांनाही त्यांच्या कॅम्पसमध्ये ई-वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मेड इन इंडिया Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचे करण्यात आले नविन अपग्रेड, पावरफुल मोटरपेक्षा असेल भन्नाट परफॉर्मेंस!

प्रतीक्षा संपली! Kia Carens 15 फेब्रुवारीला बाजारात, Alcazar आणि Safari ला टक्कर

Hyundai Controversy: काश्मीर मुद्द्यावरुन ह्युंडईची माफी, तरीही Twitter वर #BoycottHyundai ट्रेंड का?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.