Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑगस्टमध्ये वाढून 57,995 युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 36,505 युनिट्स होती.

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ
टाटा मोटर्सने नोंदवला नवा विक्रम
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 8:14 AM

मुंबई : कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑगस्टमध्ये वाढून 57,995 युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 36,505 युनिट्स होती. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत अंडर रिव्ह्यू महिन्यात कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 53 टक्क्यांनी वाढून 54,190 युनिट्स झाली आहे. पुढे, कंपनीच्या एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये वाढून 29,781 युनिट झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 17,889 युनिट्स इतकी होती. (Tata Motors registers 51 percent growth in August car sales; EV sales completed 1000 units)

M & HCV ट्रक, बस आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायासह एकूण MHCV विक्री ऑगस्ट 2021 मध्ये 7,646 युनिट्स इतकी नोंदवण्यात आली आहे जी ऑगस्ट 2020 मध्ये 3,305 युनिट्स इतकी होती. ऑगस्ट 2020 मध्ये एकूण कार विक्री 18,583 युनिट्सच्या तुलनेत वाढून 28,018 युनिट्स झाली. कंपनीने सांगितले आहे की, या महिन्यात त्यांच्या ईव्ही विक्रीने महत्त्वपूर्ण 1000 युनिट्सचा टप्पा पार केला आहे.

मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ

ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री ऑगस्टमध्ये 1,30,699 इतकी नोंदवण्यात आली आहे जी 2020 च्या याच महिन्यात 1,24,624 युनिट्स इतकी होती. ऑगस्ट महिन्यात एकूण विक्रीमध्ये 1,05,775 युनिट्सची घरगुती विक्री, 4,305 युनिट्सच्या इतर ऑरिजनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर (OEMs) ऑफ-टेक आणि 20,619 युनिट्सची निर्यात यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीच्या विक्रीचे प्रमाण प्रभावित झाले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिकूल परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी कंपनीने सर्व शक्य उपाय केले आहेत.

इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर परिणाम झाला, तर ऑगस्ट 2020 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर कोव्हिड -19 संबंधित अडथळ्यांमुळे परिणाम झाला.

बजाज ऑटोची विक्री वाढली

बजाज ऑटो, टोयोटा किर्लोस्कर, एमजी मोटर्सने ऑगस्ट 2021 दरम्यान त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली, तर एस्कॉर्ट्सने म्हटले आहे की, त्यांच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत 21.7 टक्के घट झाली आहे. विविध कंपन्यांनी त्याच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. बजाज ऑटोने म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांची एकूण विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,73,270 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण 3,56,199 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्याची अंतर्गत विक्री सात टक्क्यांनी घसरून 1,72,595 युनिट झाली आहे.

बजाज ऑटोने म्हटले आहे की, त्यांची एकूण दुचाकी विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,38,310 युनिट्सवर गेली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात 3,21,058 युनिट्स इतकी होती. कंपनीने सांगितले की, त्यांच्या निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, तर देशांतर्गत विक्री 7 टक्क्यांनी घटली आहे. कृषी यंत्रसामग्री आणि बांधकाम उपकरणे निर्माती कंपनी एस्कॉर्ट्सने सांगितले की, ऑगस्टमध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत 21.7 टक्क्यांनी घट झाली आणि या कालावधीत 5,693 युनिट्सची विक्री होऊ शकली.

MG Motor च्या विक्रीत तब्बल 51 टक्के वाढ

एस्कॉर्ट्सने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी एकूण 7,268 युनिट्सची विक्री केली होती. सणासुदीच्या काळात विक्रीत वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एमजी मोटरने सांगितले की, ऑगस्टमध्ये त्यांची किरकोळ विक्री 51 टक्क्यांच्या वाढीसह 4,315 युनिट्स होती. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने 2,851 युनिट्सची विक्री केली होती. अशोक लेलँडच्या विक्रीत 48 टक्के वाढ झाली. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण 9,360 वाहने विकली.

टोयोटाची विक्री दुप्पट

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) सांगितले की, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांची देशांतर्गत घाऊक विक्री दोन पटीने वाढली आणि 12,772 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 5,555 युनिट्सची विक्री केली होती. टीकेएम जॉइंट जनरल मॅनेजर (सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग) व्ही. व्हिसेलिन सिगामनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर त्यांच्या सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम ठेवत आहेत आणि दोन्ही मॉडेल्सना चांगली मागणी आहे. याशिवाय ग्लान्झा आणि अर्बन क्रूझरलाही चांगली मागणी दिसून येत आहे.

इतर बातम्या

Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग

धमाकेदार ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत…

(Tata Motors registers 51 percent growth in August car sales; EV sales completed 1000 units)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.