Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँचिंगआधीच Tata Nexon Kaziranga एडिशन लीक, जाणून घ्या कशी असेल नवीन कार

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी टाटा मोटर्सने नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे. यामुळे, कंपनीने पंच काझीरंगा एडिशन कार सादर केली आहे, या कारचा आयपीएल 2022 स्पर्धेदरम्यान, लिलाव केला जाईल

लाँचिंगआधीच Tata Nexon Kaziranga एडिशन लीक, जाणून घ्या कशी असेल नवीन कार
Tata Nexon Kaziranga Edition
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 3:36 PM

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) या आठवड्याच्या सुरुवातीला, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे. यामुळे, कंपनीने पंच काझीरंगा एडिशन कार सादर केली आहे, या कारचा आयपीएल 2022 स्पर्धेदरम्यान, लिलाव केला जाईल. या लिलावातून मिळणारा पैसा आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या (Kaziranga National Park) संरक्षणासाठी खर्च केला जाणार आहे. कंपनीने काझीरंगा एडिशन – नेक्सॉन, हॅरियर, सफारी, पंच नाऊ साठी एक नवीन टीझर जारी केला आहे. हा टीझर सूचित करतो की नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीसाठी अशा आणखी काझीरंगा एडीशन्सचे नियोजन केले जात आहे.

या प्रत्येक SUV चे हेडलॅम्प समोरच्या रस्त्यावर गेंड्याची प्रतिमा प्रतिबिंबित करतात. सध्या आसामच्या जंगलात 3,000 गेंडे आहेत, त्यापैकी 2,000 एकट्या काझीरंगा येथे आढळतात. हे एक शिंग असलेले गेंडे आहेत आणि त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. या विशेष टाटा काझीरंगाच्या एडिशन्सचा लिलाव हे संरक्षण सुरू ठेवण्यासाठी कामी येईल.

Nexon च्या काझीरंगा एडिशनमध्ये काय असेल खास?

रायनो मोटिफ फ्रंट फेंडर, रियर विंडस्क्रीन, ग्लोव्हबॉक्सवर दिसू शकतो आणि काझीरंगा हा शब्द स्कफ प्लेट्सवर लिहिलेला आहे. काझीरंगा एडिशन टाटाच्या स्पेशल एडिशनच्या लांबलचक यादीचा किंवा सफारी डार्क, गोल्ड आणि अॅडव्हेंचर पर्सोना एडीशन्ससह व्हिज्युअल अपडेटेड व्हेरियंटचा भाग आहे. Nexon, Nexon EV आणि Altroz ​​या गाड्यांनाही गेल्या वर्षी डार्क एडिशन ट्रीटमेंट मिळाली होती, तर Harrier ला ती काही महिन्यांपूर्वी मिळाली होती.

इंटीरियरमध्ये दोन-टोन ब्लॅक आणि ब्रॉन्झ थीम आणि अॅडजस्टेबल हेडरेस्ट, अॅपल कारप्लेसह फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, रेग्युलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, माउंटेड कंट्रोल्ससह स्टीयरिंग व्हील, दिशानिर्देशांसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉपसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.

परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल न करता, टाटा नेक्सॉन काझीरंगा एडिशन 1.2 लीटर तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर फोर-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे सुसज्ज असेल. जे अनुक्रमे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क आणि 110 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट. स्पेशल एडिशनमध्ये सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि सिक्स-स्पीड एएमटी असे दोन्ही पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

गिअरच्या झंझटपासून सुटका, या स्वस्तातील कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय

बोलेरोपासून स्कॉर्पिओपर्यंत महिंद्राच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट, आताच जाणून घ्या ऑफर!

Tata Motors | जॅग्वार होणार अधिक सुरक्षित, मिळणार नवीन दमदार फीचर्स

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.