Upcoming Cars 2022 : दिसायलाच नव्हे पेट्रोलमध्येही बचत करतील ‘या’ 5 कार! सप्टेंबरमध्ये होणार लाँचिंग
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 5 कार्स लाँच करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये मारुती ते किआपर्यंत सर्व पर्याय ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये अनेक अपग्रेटेड फीचर्स बघायला मिळणार आहे. तसेच यापैकी काही गाड्यांना हायब्रीड इंजिनही मिळेल.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात अनेक कार दमदार फीचर्ससह (Features) दाखल होताना दिसून येत आहे. आज या लेखातून आपण अशाच काही कारबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होतील. या गाड्यांना मजबूत मायलेज (Mileage) तर मिळेलच शिवाय कमी पेट्रोलमध्ये लांबच्या प्रवासासाठी या कार उत्तम ठरणार आहेत. यात मारुतीच्या कार्सचाही समावेश आहे.
Maruti Grand Vitara
मारुतीची लेटेस्ट हायब्रीड कार सप्टेंबरमध्ये दाखल होऊ शकते. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. कंपनीने आपल्या मीड साईजच्या एसयुव्ही कारची आधीच माहिती दिली आहे. परंतु कंपनीने अद्याप किंमतीवरून पडदा उचललेला नाही. या कारचे प्री-बुकिंग सुरू झाले असून आतापर्यंत 40 हजार युनिटचे बुकिंग झाले आहे.
Hyundai Venue N-Line
Hyundai Venue N-Line 6 सप्टेंबर रोजी बाजारात येईल. कंपनीच्या N लाइनअपमधील ही दुसरी कार आहे, याआधी कंपनीने i20 सादर केली आहे. हे स्पोर्टी लूकसह येईल आणि एक मजबूत इंटीरियर देखील त्यात दिसू शकेल. कंपनी टेक्नीकली यात कोणतेही मोठे बदल करणार नसल्याची माहिती आहे.
Mahindra XUV 400
Mahindra XUV 400 इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये नॉक करू शकते. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स, चांगले इंटिरियर आणि कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतील. ही कार 8 सप्टेंबरला ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
Toyota Urbana Cruiser HyRyder
टोयोटाकडून ही कार हायब्रीड सेगमेंटमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह सप्टेंबरमध्ये लॉन्च केली जाईल. ही एसयूव्ही सेगमेंटची कार आहे.
Kia Sonet X Line
Kia Sonet X Line मध्ये का ही कॉस्मेटिक बदल दिसतील. ही कार सध्याच्या Kia Sonet चे अपग्रेटेड व्हर्जन आहे.