सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती. जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, ह्युंदायच्या क्रेटा एसयूव्ही आणि Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक या दोन गाड्यांनी टॉप सेलिंग वाहनांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ह्युंदाय ही मारुतीनंतरची देशातील दुसरी सर्वात यशस्वी वाहन कंपनी ठरली आहे.