इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…

भारतामध्ये अनेक इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध आहेत ज्यांची किंमत सुद्धा वेगवेगळी आहे, या बाईक मध्ये हार्ले डेविडसन सारखी दिसणारी भारताची पहिली इलेक्ट्रिक क्रूजर बाईकचा सुद्धा समावेश आहे

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या...
Tork Kratos, Tork Kratos R
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 6:05 PM

मुंबई : ऑटो क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस विकास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय टू व्हीलर सेगमेंटचे विस्तारीकरण जलद गतीने होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची संख्यासुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे परंतु सध्याच्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये सुद्धा प्रचंड वेगाने बदल होताना दिसत आहेत. त्यात आता दोन नव्या बाईकचा समावेश झाला आहे. या बाईकचे नाव Tork Kratos आणि Tork Kratos R आहे. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक बाईक्समध्ये रस असेल. तुम्हालाही इलेक्ट्रिक बाईक घ्यायची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण बाजारात इलेक्ट्रिक बाईकमध्ये दोन नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक बाईकबद्दल जे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत…

भारतामध्ये बुधवारी इलेक्ट्रिक बाईक विश्वामध्ये दोन नव्या मोटरसायकलचा समावेश झालेला आहे. या दोघांमध्ये एक सारखीच ड्रायव्हिंग रेंज मिळते तसेच काही फीचर्स यांच्यामध्ये फरक आहे. Tork Kratos R या इलेक्ट्रिक बाइकबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकमध्ये आपल्याला 120 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज मिळेल सोबतच याची टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रतितास असेल. या बाईकमध्ये 4 किलो वॅट बॅटरी आहे. जी 1 तासात 80 टक्के पर्यंत चार्ज होते सोबतच फाइंड माय व्हीकल सारखे फिचर्स सुद्धा उपलब्ध आहेत.

भारताची पहिली इलेक्ट्रिक रेंजर्स मोटरसायकल कोमाकी रेंजर ने सुद्धा बाईक विश्वात पदार्पण केले आहे. ही बाईक मंगळवारी लाँच झाली. या बाईकचे डिझाईन हार्वे डेविडसन सारखेच आहे. यात 4000 वॉल्टची मोटर लावण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक तीन रंगांमध्ये बाजारात आणलेली आहे. बाईक प्रेमी ना Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगात ही बाईक दिसेल. या बाईकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सुविधा सुध्दा मिळणार आहेत जसे की ब्लूटूथ साउंड सिस्टम, साइड स्टँड सेंसर, क्रूजर कंट्रोल फीचर्स, एंटी थीफ्ट लॉकिंग सिस्टम असतील सोबतच यामध्ये डुअल स्टोरेज बॉक्स चा ऑप्शनदेखील देण्यात आला आहे.

Revolt RV 400 ही 150 किलोमीटरची ड्रायविंग रेंज देते. या बाईकची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी 4.5 तासांचा कालावधी लागतो. याची टॉप स्पीड 80 किमी आहे. या बाईकमध्ये आपल्याला 3 मोड्स दिले गेले आहेत ज्यात ECO, Normal आणि Sport चा समावेश आहे. कंपनीने दावा केला आहे की, या इलेक्ट्रिक बाईक मध्ये 100 किलोमीटरवर अंदाजे 9 रुपयेचा खर्च येईल. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत दिल्ली (एक्स-शोरूम) 90,799 रुपये एवढी आहे.

बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास, Joy e-bike Monster मध्ये पॉवरसाठी लिथियम आयनची बॅटरी दिली गेली आहे. यामध्ये 250W चे DC ब्रेशलेस हब मोटर दिले आहे. या इलेक्ट्रिक बाईकला एक वेळ चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. जर या बाईच्या रेंज बद्दल बोलायचे झाल्यास Joy e-bike Monster इलेक्ट्रिक बाईक जर आपण फुल चार्ज केल्यास 75 किलोमीटरची रेंज देते. इलेक्ट्रिक बाईक वर 280 किलोमीटरवर एकंदरीत खर्च 70 रुपये एवढा येईल याशिवाय या इलेक्ट्रिक बाईक ची शोरूम मध्ये किंमत 98,666 रुपये एवढी आहे.

संबंधित बातम्या

शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र; सेन्सेंक्स 581, निफ्टी 167 अंकांनी गडगडला

आता विना इंटरनेटशिवाय आपण करू शकतो पैशांचे व्यवहार, UPI Light नेमके आहे तरी काय?

आता इंटरनेटशिवाय आपण करू शकतो पैशांचे व्यवहार, UPI Light नेमके आहे तरी काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.