AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिअरच्या झंझटपासून सुटका, या स्वस्तातील कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय

गिअरच्या त्रासापासून वाचण्यासाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या स्वस्तातील कारचा पर्याय ग्राहकांसाठी खुला आहे. अगदी परवडणार्या किंमतीत या कार तुम्ही खरेदी करु शकतात.

गिअरच्या झंझटपासून सुटका, या स्वस्तातील कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय
कार
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 11:57 AM
Share

नवी दिल्ली : कार आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहे. कोरोना काळात ज्या वेळी सार्वजनिक वाहतूक बंद होती त्या वेळी दळणवळणासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. एका रिपोर्टनुसार तर कोरोना काळात सर्वाधिक नव्या तसेच वापरलेल्या कारची विक्री (sales) झालेली बघायला मिळाली. कुठेही लांब प्रवास करायचा असल्यास कार हा सर्वोत्तम पर्याय ठरत असतो. त्यामुळे कारचे एक वेगळे महत्व आहे. परंतु कार चालवत असताना नेहमीची अडचण येते ती वारंवार गिअर (gear) बदलण्याची रहदारीच्या ठिकाणी वारंवार गिअर बदलावे लागत असतात. अनेकदा नवीन शिकत असलेल्या लोकांना कार चालविताना गिअर बदलण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असतात. सुरुवातीच्या टप्प्यात, कार शिकणाऱ्यांना या समस्येला अनेक वेळा तोंड द्यावे लागते. वारंवार गिअर्स बदलण्याच्या त्रासातून मुक्त व्हायचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह (automatic gear) परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

1) डस्टन रेडी गो

डस्टन रेडी गो या कारचे पाहिजे त्या प्रमाणात नाव झाले नाही. ही कंपनी अजूनही कार कंपन्यांमध्ये आपले नाव वरच्या श्रेणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. पाहिजे तशी लोकप्रियता मिळालेली नाही. ही कार AMT 1.0 T पर्यायामध्ये उपलब्ध आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 5 लाखांपेक्षा कमी आहे.

2) रेनल्ट क्वीड

क्वीडने कमी कालावधील आपली चांगली लोकप्रियता निर्माण केली आहे. रस्त्यावर क्वीड सहज दिसून येत असते. यात पाच स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचे नाव Kwid RXL ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. तर क्विलंबर एएमटी ऑप्शन डीटी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.80 लाख रुपये आहे.

3) ह्युंडाई सँट्रो

ही कारदेखील एएमटी गिअरबॉक्स प्रकारात येते. ह्युंडाई सँट्रो हे नाव आजकाल सर्वांनाच माहिती आहे छोट्या कुटुंबासाठी ही कार अगदी बेस्ट आहे. यात 1.1 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 69 एचपी पॉवर देऊ शकते. त्याचे नाव मॅग्ना एएमटी आहे आणि तिची किंमत सुमारे 5.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर एस्टा मॉडेलची किंमत 6.50 लाख रुपये आहे.

4) मारुती सुझुकी एस-प्रेसो

या कारलाही एएमटीचा पर्याय उपलब्ध आहे. S-Presso VXI AT ची एक्स शो रूम किंमत 5.05 लाखांपासून ते 5.21 लाखांपर्यंत आहे. या कारमध्ये 1.0 लीटर इंजिन आहे, जे 68 एचपी पॉवर देते.

5) मारुती सुझुकी वॅगनआर

ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे आणि ती एएमटी युनिटमध्ये देखील उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे.

इतर बातम्या:

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

Ahmedabad Serial Blast: एक तासात 21 स्फोट घडवले, अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी 38 आरोपींना फाशी

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.