नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) 1 जानेवारी 2022 पासून भारतात सादर केलेल्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ जाहीर केली, ज्यात बेस्टसेलर कार फॉर्च्युनर SUV आणि इनोव्हा क्रिस्टा यांचादेखील समावेश आहे.

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश
Toyota
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:56 PM

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) 1 जानेवारी 2022 पासून भारतात सादर केलेल्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ जाहीर केली, ज्यात बेस्टसेलर कार फॉर्च्युनर SUV आणि इनोव्हा क्रिस्टा यांचादेखील समावेश आहे. एका प्रेस स्टेटमेंटमध्ये टोयोटाने सांगितले की, कच्च्या मालासह इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ होत असल्याने किंमती वाढवण्याची गरज आहे. कंपनीने पुढे सांगितले की, खर्चात वाढ झाल्याचा परिणाम त्यांच्या ग्राहकांवर शक्य तितका कमी होईल याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. (Toyota Fortuner, Innova Crysta and other TKM vehicles became expensive in 2022)

टोयोटा आता अशा कार आणि दुचाकी निर्मात्यांपैकी एक आहे ज्या कंपनीने त्यांच्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. वाढता इनपुट खर्च आणि सेमीकंडक्टर चिप्सची जागतिक स्तरावरील कमतरता यामुळे अनेक ब्रँड्ससमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत नवीन तसेच फेसलिफ्ट मॉडेल्सचे अनेक हाय-प्रोफाइल व्हेरिएंट लॉन्च झाले आहेत, यापैकी अनेक उत्पादनांचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) देखील वाढला आहे. विशेषतः लोकप्रिय कॉम्पॅक्ट आणि एसयूव्ही वाहनांच्या विशिष्ट रेंजमधील मॉडेल्ससाठीचा वेटिंग पीरियड मोठा आहे.

दशकातील सर्वात वाईट फेस्टिव्ह पीरियड

देशातील कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना, वाहनांची मागणी वाढत आहे, त्यामुळे प्रोडक्शन सायकल आणि पुरवठ्याच्या समस्या वाढत आहेत. 2022 मध्येही या समस्या संपण्याची शक्यता कमीच आहेत, किंबहुना या समस्या थांबणं सध्या तरी शक्य नाहीत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने अलीकडेच नमूद केले आहे की, या वर्षीच्या नोव्हेंबरमधील फेस्टिव्ह पीरियड जवळजवळ एक दशकातील सर्वात वाईट होता, विशेषतः या काळात चिपच्या तुटवड्याकडे लक्ष वेधले गेले. ज्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे डीलर्सना उत्पादन पाठवण्यात अडचणी येत आहेत. प्रवासी वाहनांची नोंदणी 3,24,542 युनिट्सवर झाली आहे, जी मागील वर्षीच्या फेस्टिव्ह पीरियडमधील 4,39,564 युनिट्सच्या तुलनेत 26 टक्क्यांनी कमी आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) नेही सध्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकला आहे. SIAM चे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, “आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुरुवातीला विक्रीत झालेल्या मोठ्या घसरणीला तोंड देण्यासाठी उत्पादक सणासुदीच्या हंगामात बँकिंग करत होते. तथापि, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.”

इतर बातम्या

Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी

Audi Q7 | 2022 ऑडी Q7 चे उत्पादन भारतात सुरू, दमदार फिचर्स, सुपर लूक, जाणून घ्या बहूचर्चित ऑडी Q7बद्द्ल सर्व काही

(Toyota Fortuner, Innova Crysta and other TKM vehicles became expensive in 2022)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.