Toyota : टोयोटाच्या हायराइडर हायब्रिड एसयूव्हीची धूम… काय असणार अपकमिंग कारची किंमत?

अपकमिंग एसयुव्हीला चार व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाणार आहे. तर दुसरीकडे हायब्रिड इंजिनने सुसज्ज ही कार अनेक चांगल्या फीचर्ससह बाजारात उपलब्ध राहून ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. युजर्सना पहिल्यांदा या सेगमेंटमध्ये AWD मिळणार आहे.

Toyota : टोयोटाच्या हायराइडर हायब्रिड एसयूव्हीची धूम... काय असणार अपकमिंग कारची किंमत?
हायराइडर हायब्रिड एसयूव्हीची धूमImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 12:37 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी टोयोटा (Toyota) किर्लोस्कर मोटरने अर्बन क्रूजर हायराइडरचे (Hhyryde) लाँचिंग केले होते. आता कंपनी ऑगस्टमध्ये लाँच करण्याआधी हायराइडरचे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरु करणार आहे. टोयोटाने अपकमिंग मिड साइज एसयुव्हीची बुकिंग देखील सुरु केली आहे. रिपोर्टनुसार, या अपकमिंग कारची किंमत इतर स्पर्धक कारच्या किंमतीनुसार ठरविण्यात येणार आहे. अपकमिंग एसयुव्हीला (SUV) चार व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाणार आहे. तर दुसरीकडे हायब्रिड इंजिनने सुसज्ज ही कार अनेक चांगल्या फीचर्ससह बाजारात उपलब्ध राहून ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. युजर्सना पहिल्यांदा या सेगमेंटमध्ये AWD मिळणार आहे. रिपोर्टनुसार, याच्या बेस मॉडेलचे दर 9.8 ते 9.85 लाख रुपयांपर्यंतच्या एक्सशोरुम किंमतीपासून सुरु होणार आहेत.

बेस व्हेरिएंटची संभाव्य किंमत

अपकमिंग कारचे के15सी माइल्ड हायब्रिड इंजिनला मारुती सुझुकीने लोकली तयार केले आहे. ‘गाडीवाडी’नुसार हायराइडरची एंट्री लेव्हर व्हेरिएंटची संभावित एक्सशोरुम किंमत 9.8 ते 9.85 लाख रुपयांपासून सुरु होउ शकते. या व्हेरिएंटमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल आणि पॅडल शिफ्टर्ससह ऑटोमॅटीक ट्रांसमिशन मिळणार आहे. हे मॉडेल इंटिग्रेटेड स्टार्टर जेनरेटरने (आईएसजी) सुसज्ज असणार आहे. एडब्ल्यूडी फीचर मिळत असलेला हा एकमेव पावरट्रेनर असल्याचे सांगण्यात येत आहे. याची संभावित एक्सशोरुम किंमत 15 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

पहिली स्ट्राँग हायब्रिड कार

या सेगमेंटमधील ही पहिली कार आहे, ज्यात, स्ट्राँग हायब्रिड टेक्निकचा वापर करण्यात आलेला आहे. स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये टोयोटा हायब्रिड सिस्टमसह 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. या व्हेरिएंटमध्ये ई-ड्राइव्ह ट्रांसमिशनचा एक्सपिरियंस मिळणार आहे. सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट इंधनचा बचत करतो आणि कार्बन उत्सर्जनमध्येही कमी येण्यासाठी ईव्ही ओनली मोड उपलब्ध आहे. अपकमिंग स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटची संभावित एक्सशोरुम किंमत 14 लाख रुपयांपासून ते 19.85 लाख रुपयांपर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फीचर्स?

टोयोटा अर्बन क्रूजर हायराइडरला सात सिंगल टोन आणि चार ड्युअल टोन कलर पर्यायांसह बाजारात आणले जाणार आहे. अपकमिंग कारमध्ये युजर्सला 9 इंचाचा टचस्क्रीन, 6  एअरबेग, एचयुडी, 360 डिग्री कॅमेरा सिस्टम, वायरलेस चार्जिंग पेड, क्रूज कंट्रोल, रिक्लाइनिंग रियर सीट, एंबियंट लाइटिंग आदी फीचर्स मिळणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....