1.80 कोटी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या Toyota Hilux चं भारतीय रस्त्यांवर दर्शन, जानेवारी 2022 मध्ये बाजारात

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी लवकरच भारतातील अॅडव्हेंचर लाईफस्टाईल व्हीकल हिलक्स पिकअप ट्रकसह (Hilux pickup truck) फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा यांच्या लाइनअपचा विस्तार करण्यासाठी सज्ज आहे.

1.80 कोटी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या Toyota Hilux चं भारतीय रस्त्यांवर दर्शन, जानेवारी 2022 मध्ये बाजारात
Hilux pickup truck
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:30 AM

Toyota Hilux Pickup Truck Launch India : टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी लवकरच भारतातील अॅडव्हेंचर लाईफस्टाईल व्हीकल हिलक्स पिकअप ट्रकसह (Hilux pickup truck) फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा यांच्या लाइनअपचा विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. 2022 मध्ये जपानी कार निर्माता कंपनी 2021 हिलक्स भारतात लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. (Toyota Kirloskar Motor Hilux pickup truck spotted on Indian roads ahead of its launch in january 2022)

रविवारी अनेक नेटिझन्सनी लाल टोयोटा हिलक्स ट्रक पाहिला. सोशल मीडिया पोस्टवरून कळते की, हा ट्रक बहुधा व्यावसायिक शूटसाठी बाहेर काढला गेला होता, कारण त्याच्या मागे कॅमेरे बसवलेले दुसरे वाहन होते.

2022 मध्ये लाँच होणार टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हिलक्स पिकअप ट्रक लाँच करण्याच्या तयारीत आहे. टोयोटा कदाचित नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात भारतात Hilux लाँच करेल. जागतिक स्तरावर, हिलक्स हे टोयोटाचे लोकप्रिय मॉडेल आहे, 1968 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या ट्रकच्या 1.8 कोटी युनिट्सची विक्री झाली आहे.

2021 टोयोटा हिलक्स फेसलिफ्ट मॉडेल, जे अलीकडेच जागतिक बाजारपेठेत सादर केले गेले आहे, ते IMV-2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टोयोटाची फॉर्च्युनर एसयूव्ही आणि इनोव्हा क्रिस्टा देखील याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. जागतिक बाजारपेठेत विकले जाणारे Hilux मॉडेल 2.8 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे, जे सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन युनिटशी जोडलेले आहे.

टोयोटा हिलक्स पिकअप ट्रकचे फंक्शन्स

हिलक्स एक सक्षम ऑफ-रोडर मानला जातो, तसेच लाईफस्टाईल व्हीकल म्हणून भूमिका बजावण्यासाठी केबिनमध्ये अनेक सुखसोयी आणि सुविधा दिल्या आहेत. यामध्ये अॅम्बियंट लाइट, ऑटो एअर कंडिशनिंग, आठ इंची इन्फोटेनमेंट स्क्रीन, जेबीएल स्पीकर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. भारतात, टोयोटा हिलक्स फॉर्च्युनरसोबत काही प्रमुख भाग शेअर करण्याची शक्यता आहे आणि त्याची किंमत 30 लाख रुपये इतकी असू शकते. हे वाहन भारतीय बाजारात इसुझू व्ही-क्रॉसला टक्कर देईल.

इतर बातम्या

Suzuki ते Hero, भारतात 2022 मध्ये 4 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार

अमिताभ बच्चन आणि युवराज सिंहनंतर MG Motor कडून NFT ची घोषणा, ठरली पहिलीच कारउत्पादक कंपनी

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Toyota Kirloskar Motor Hilux pickup truck spotted on Indian roads ahead of its launch in january 2022)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.