Triumph Tiger Sport 660 बाजारात दाखल, जाणून घ्या नव्या स्पोर्टबाईकमध्ये काय आहे खास

ट्रायंफ मोटरसायकल्सने (Triumph Motorcycles) ट्रायंफ ट्रायडंट 660 रोडस्टरवर आधारित ऑल न्यू ट्रायम्फ टायगर स्पोर्ट 660 (Triumph Tiger Sport 660) चे अनावरण केले आहे.

Triumph Tiger Sport 660 बाजारात दाखल, जाणून घ्या नव्या स्पोर्टबाईकमध्ये काय आहे खास
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 5:11 PM

मुंबई : ट्रायंफ मोटरसायकल्सने (Triumph Motorcycles) ट्रायंफ ट्रायडंट 660 रोडस्टरवर आधारित ऑल न्यू ट्रायम्फ टायगर स्पोर्ट 660 (Triumph Tiger Sport 660) चे अनावरण केले आहे. टायगर स्पोर्ट 660 ही एक अॅडव्हेंचर स्पोर्ट टूरिंग मोटरसायकल आहे जी ऑफ-रोड ओरिएंटेड एडीव्हीऐवजी स्पोर्ट टूरिंगसाठी डिझाइन केलेली आहे आणि ती ट्रायडंट 660 प्लॅटफॉर्म एक्सटेंड करते. (Triumph Tiger 660 Makes Global Debut Ahead Of India Launch)

ही बाईक ट्रायडंट 660 वर आधारित असली तरी, टूरिंग मशीनचा भाग दिसतो. यामध्ये स्पोर्टी दिसणारी हाफ-फेअरिंग, स्ट्रेट रायडिंग पोजिशन, सस्पेन्शन ट्रॅव्हल, सीटची उंची आणि टूरिंग एबिलिटीसाठी रेनफोर्स्ड सब-फ्रेम्स समाविष्ट आहेत. त्याची रचना आकर्षक आहे पण ती टायगर 900 सारखी नाही. मोटारसायकलमध्ये ट्विन एलईडी हेडलॅम्प आणि टायगर स्पोर्ट 660 च्या टूरिंग क्रेडेंशियल्ससह उंच हाईट-अॅडजस्टेबल विंडशील्ड आहे.

Triumph Tiger Sport 660 मध्ये काय आहे खास

  • ट्रायम्फ टायगर स्पोर्ट 660 च्या इंधन टाकीची क्षमता ट्रायडंट 660 वरील 14 लीटर इंधन टाकीच्या तुलनेत 17 लीटर करण्यात आली आहे आणि टायगर स्पोर्ट 660 ला एक नवीन कॉकपिट देखील मिळते, ज्यामध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील आहे.
  • मोटारसायकल वेगवेगळ्या एर्गोनॉमिक्स, अधिक स्ट्रेट रायडिंग पोझिशन्स आणि उत्तम वेदर सिक्योरिटी फीचरसह येते.
  • फीचर्स लिस्टमध्ये, टायगर स्पोर्ट 660 मध्ये दोन राइडिंग मोड (रोड आणि रेन), स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनेल एबीएस आहेत. ही बाईक तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
  • इन्स्ट्रुमेंट कन्सोल TFT डिस्प्लेसह येतो आणि अॅक्सेसरी-फिट MyTriumph कनेक्टिव्हिटी सिस्टमला सपोर्ट करते. सीटची उंची 835 मिमी आहे तर कर्ब वेट 206 किलो आहे. ही बाईक 22.2 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • सस्पेन्शन ट्रॅव्हलला दोन्ही टोकांवर 150 मिमी ट्रॅव्हलसह वाढवण्यात आला आहे. 41 मिमी अपसाइड डाउन फ्रंट फोर्क नॉन-एडजस्टेबल आहे. तर मोनोशॉकला रिमोट प्रीलोड अॅडजस्टर मिळते.
  • निसान ब्रेक्स ट्रायडेंट 660 सह देखील शेअर केले गेले आहेत, ज्यात दोन पिस्टन स्लाइडिंग कॅलिपर्स आहेत. ज्यात फ्रंटला 310 मिमी ट्विन डिस्क आहे आणि सिंगल-पिस्टन कॅलिपर आहे, ज्यामध्ये 255 मिमी डिस्क ग्रिपिंग मागच्या चाकात आहे.
  • ट्रायडंट 660 सह सामायिक केलेले 660 सीसी इनलाइन तीन-सिलेंडर इंजिन 10,250 आरपीएमवर 79 बीएचपी पॉवर आणि 6,250 आरपीएमवर 64 एनएम टॉर्क जनरेट करते.
  • 660 सीसी इनलाइन तीन-सिलेंडर इंजिन ट्रायडंट 660 सह शेअर केलं आहे, जे 10,250 rpm वर 79 bhp पॉवर आणि 6,250 rpm वर 64 nm टॉर्क जनरेट करते.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Triumph Tiger 660 Makes Global Debut Ahead Of India Launch)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.