Triumph Street Twin EC1 भारतात लाँच, स्पेशल एडिशन मर्यादित काळासाठीच उपलब्ध

ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने नवीन स्ट्रीट ट्विन EC1 स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या बाईकची किंमत 8.85 लाख रुपये (एक्स-शोरूम - पॅन इंडिया) आहे.

Triumph Street Twin EC1 भारतात लाँच, स्पेशल एडिशन मर्यादित काळासाठीच उपलब्ध
Triumph Street Twin EC1
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:09 PM

Triumph Street Twin EC1 Launch India : ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने नवीन स्ट्रीट ट्विन EC1 स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या बाईकची किंमत 8.85 लाख रुपये (एक्स-शोरूम – पॅन इंडिया) आहे. EC1 स्पेशल एडिशन स्ट्रीट ट्विनला एक यूनिक कस्टम-प्रेरित स्कीम अॅड मिळते आणि ही बाईक केवळ एका वर्षासाठी उपलब्ध असेल. ट्रायम्फने Rocket 3 R 221 आणि Rocket 3 GT एडिशन मोटारसायकल सोबतच स्ट्रीट ट्विन EC1 या स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केल्या आहेत. (Triumph, Triumph Street, Triumph Street Twin, Triumph Street Twin EC1, Triumph Street Twin EC1 India, Triumph Street Twin EC1 price)

स्ट्रीट ट्विन EC1 ला मॅट अॅल्युमिनियम सिल्व्हर आणि मॅट सिल्व्हर आइस फ्युएल टँकसह हाताने पेंट केलेले सिल्व्हर कोच लायनिंग, डेडिकेटेड नवीन EC1 ग्राफिक्स आणि ट्रायम्फ बॅज मिळतात. बाजूच्या पॅनल्सला मॅट सिल्व्हर आइस फिनिश देण्यात आले आहे तर मडगार्ड्स मॅट अॅल्युमिनियम सिल्व्हरमध्ये रंगवण्यात आले आहेत.

Triumph Street Twin EC1

मोटारसायकलला ब्लॅक 10-स्पोक व्हील, एक ब्लॅक हेडलॅम्प काउल, ब्लॅक-फिनिश्ड मिरर आणि ब्लॅकसिग्नेचर-शेप्ड इंजिन कव्हर देखील मिळते. तसेच, एक मॅट सिल्व्हर आइस फ्लाय स्क्रीन देखील पर्यायी एडिशन म्हणून प्रदान केली आहे. स्ट्रीट ट्विन EC1 मधील बदल हे स्टायलिंग अपग्रेडपुरते मर्यादित आहेत. दुसरीकडे, मेकॅनिकल स्पेसिफिकेशनस स्टँडर्ड मोटरसायकल प्रमाणेच राहतील. स्ट्रीट ट्विन EC1 मध्ये BS6 कम्पलायंट 900CC, ट्विन-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे, जे 7,500rpm वर 64.1bhp पॉवर आणि 3,800rpm वर 80Nm पीक टॉर्क जनरेट करते. मोटर पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

स्टँडर्ड स्ट्रीट ट्विन प्रमाणेच, मोटरसायकलवरील हार्डवेअरमध्ये 41 MM कार्ट्रिज फ्रंट फोर्क्स, प्रीलोड-अॅडजस्टेबल ट्विन रिअर शॉक, दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क आणि पिरेली फॅंटम स्पोर्ट्स कॉम्प टायर्स समाविष्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक रायडर एड्समध्ये ABS, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि दोन राइडिंग मोड (रेन अँड रोड) समाविष्ट आहेत.

सर्वात जास्त टॉर्क जनरेट करणारी बाईक बाजारात

ट्रायम्फने मंगळवारी आपली लेटेस्ट मोटरसायकल लॉन्च केली आहे. ट्रायम्फ रॉकेट 3 221 स्पेशल एडिशन असे या बाईकचे नाव आहे. CarAndBike च्या अहवालानुसार, ही जगातील सर्वाधिक टॉर्क जनरेट करणारी बाईक आहे. या बाईकची किंमत 20.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन बाईक दोन ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे, यामध्ये जी आर आणि जी टी या ट्रिम्सचा समावेश आहे. दोन्ही ट्रिम्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. आर व्हेरियंटची किंमत 20.80 लाख रुपये आहे, तर जीटी व्हेरिएंटची किंमत 21.40 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.

ट्रायम्फ मोटरसायकलच्या या स्पेशल एडिशनला रेड हॉपर कलर फ्युएल टँक देण्यात आला आहे आणि फ्रंटला एक विशेष प्रकारचा कॉन्ट्रास्ट देण्यात आला आहे. यात काळ्या रंगाचं मडगार्ड, बॉल्स हेडलाइट आणि विशेष प्रकारची स्क्रीन आहे. ट्रायम्फ रॉकेट 3 221 स्पेशल एडिशन 2500 cc, 3 सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे जे 6000 rpm वर 165 Bhp पॉवर आणि 4000 rpm वर 221 Nm टॉर्क जनरेट करते. ही जगातील सर्वाधिक टॉर्क जनरेट करणारी बाईक आहे. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. बाईकमधील ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर 320 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे, तर मागे 300 mm ची फ्लोटिंग डिस्क आहे.

इतर बातम्या

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

(Triumph, Triumph Street, Triumph Street Twin, Triumph Street Twin EC1, Triumph Street Twin EC1 India, Triumph Street Twin EC1 price)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.