Volkswagen च्या लोकप्रिय कार स्वस्तात खरेदीची अखेरची संधी, 3 दिवस बाकी
नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे 3 दिवस उरले आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही कार बुक करा. 1 जानेवारी 2022 रोजी अनेक मोठ्या ऑटो कंपन्या त्यांच्या कारच्या किमती वाढवणार आहेत.
मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे 3 दिवस उरले आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही कार बुक करा. 1 जानेवारी 2022 रोजी अनेक मोठ्या ऑटो कंपन्या त्यांच्या कारच्या किमती वाढवणार आहेत. त्यामुळे 2022 मध्ये कार खरेदी करणे महागडे ठरू शकते. भारतात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ऑडीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. (Volkswagen to increase price of Polo, Vento and Taigun SUV from 1 january 2022)
फोक्सवॅगनने गुरुवारी जाहीर केले की, ते नवीन वर्षात 1 जानेवारीपासून पोलो, व्हेंटो आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही टायगुनच्या किमती वाढवणार आहेत. फॉक्सवॅगन आता अशा कार निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांनी जानेवारीपासून दरवाढीची पुष्टी केली आहे. देशातील इतर अनेक ब्रँड्सप्रमाणे, फोक्सवॅगनने वाढत्या इनपुट्स आणि ऑपरेशनल कॉस्टमुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Volkswagen Taigun 1 जानेवारीपासून महागणार
मॉडेल आणि निवडलेल्या व्हेरिएंटवर अवलंबून किंमत वाढ 2% ते 5% दरम्यान असेल. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले की, “इनपुट आणि ऑपरेशनल खर्चात भरीव वाढ झाल्यामुळे, आम्ही आमच्या उत्पादनांच्या किमती 2% ते 5% ने वाढवण्याचा आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” आमचा ब्रँड, उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ बनवण्याचा आणि फोक्सवॅगनला आमच्या ग्राहकांमध्ये पसंतीचा ब्रँड म्हणून स्थापित करण्याचा आमचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न आहे.”
सध्या, फॉक्सवॅगन अनेक मॉडेल्स ऑफर करते, यात टिगुआन आणि टिगुआन ऑलस्पेसचा समावेश आहे. पण सर्वांच्या नजरा मध्यम आकाराच्या सेडानवरही असतील जी 2022 च्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे.
बाजारात नव्याने लॉन्च झालेल्या कारची मागणी झपाट्याने वाढत असताना, जगभरातील वाढत्या किमती आणि सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादक आणि विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बुकिंग करूनही ग्राहकांना गाडीसाठी बराच वेळ थांबावे लागत आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ऑडी आणि मर्सिडीज सारख्या इतर वाहन कंपन्यांनी आधीच किंमत वाढीची पुष्टी केली आहे.
कशी आहे Volkswagen Tiguan?
2021 Volkswagen Tiguan ही कार आज 32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स-शोरूम) या महिन्याच्या लॉन्च करण्यात आली. ही पाच सीटर एसयूव्ही फोक्सवॅगनच्या भारत 2.0 धोरणाचा भाग आहे. नवीन प्रीमियम SUV फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी ऑटोमेकरने ऑफर केलेल्या इतर अनेक मॉडेल्ससारखीच आहे.
नवीन जनरेशन Tiguan SUV काही उल्लेखनीय बदलांसह बाजारात दाखल झाली आहे. प्रीमियम SUV मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे बदल महत्त्वाचे असू शकतात. हे नवीन मॉडेल फक्त पेट्रोल व्हेरिएंटमध्ये येईल आणि 2.0 लीटर फोर-सिलेंडर टर्बो-पेट्रोल मोटर इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 190hp पॉवर आउटपुट आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने इंजिनला 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले आहे. फोक्सवॅगनची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम या SUV साठी स्टँडर्ड म्हणून येईल.
इंटीरियर आणि सेफ्टी फीचर्स
नवीन टिगुआनच्या इंटीरियरमध्ये डिजिटल व्हर्च्युअल कॉकपिट ड्रायव्हर डिस्प्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सुसज्ज आहे. SUV ला 30 रंगांची एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि एक पॅनोरमिक सनरूफ देखील मिळते जे प्रीमियम सेगमेंटला एका उंचीवर घेऊन जाते. या कारच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, कारला 6 एअरबॅग्ज, ड्राईव्ह आणि क्रूझ कंट्रोल, ABS, ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
एक्सटीरियर आणि इतर फीचर्स
फॉक्सवॅगनने SUV चं एक्सटीरियर अपडेट केलेल्या नवीन बदलांसह क्लीन ठेवलं आहे. क्रोम अॅक्सेंटसह रिफाइन फ्रंट ग्रिल एसयूव्हीला स्टायलिश लूक देते. एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प आणि ट्रँगल फॉग लॅम्प असलेले नवीन बंपर या एसयूव्हीला त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक लूक देतात. टेलगेटच्या मध्यभागी टिगुआन अक्षरांसह स्लिमर एलईडी टेललाइट्ससह, एसयूव्हीचा मागील भाग कॉम्पॅक्ट दिसतो.
इतर बातम्या
E Scooter : One-Moto नं लॉन्च केलं Electa, एका चार्जिंगमध्ये धावणार 50 किलोमीटर!
Mahindra Automotive 2022 : महिंद्रा लॉन्च करणार नव्या लोगो आणि डिझाइनसह XUV300
(Volkswagen to increase price of Polo, Vento and Taigun SUV from 1 january 2022)