‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही; जाणून घ्या या स्कूटरबाबत

ईव्ही सेवा पुरवठादार देशभरातील विविध महानगरांमध्ये उपलब्ध आहे. मिराकल इलेक्ट्रिक दुचाकीवर उत्सर्जनमुक्त प्रवासाचे आश्वासन दिले जात आहे. यूलू आता विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही; जाणून घ्या या स्कूटरबाबत
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 9:59 PM

नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात जाणे टाळत आहेत. कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. या परिस्थितीचा अनेक कंपन्यांना फायदा होत आहे. डिलिव्हरीच्या क्षेत्रातील कंपन्यांना याचा विशेष फायदा झाला असून त्या अनुषंगाने कंपन्या नवनवीन पावले टाकत आहेत. ई-मोबिलिटी सेवा पुरवठादार असलेल्या यूलू कंपनीनेही असेच पाऊल टाकले आहे. (Yulu company today announced the launch of the electric scooter Yulu Dex)

यूलू कंपनीने अन्न, किराणा आणि औषधे वितरित करण्याच्या उद्देशाने एक इलेक्ट्रिक स्कूटर ‘यूलू डेक्स’ लाँच करण्याची आज घोषणा केली. कंपनीने डिसेंबर 2021 पर्यंत पहिल्या टप्प्यात बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये 10,000 यूलू डेक्स तैनात करण्यासाठी अनेक अन्न/ वस्तू वितरण पुरवठादारांशी भागीदारी केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यूलू डेक्स विशेषत: कामगारांचा थकवा कमी करण्यासाठी बनवण्यात आले आहे. यामुळे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा ऑपरेटिंग खर्च सुमारे 35 ते 40 टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. शून्य-उत्सर्जन वाहन असल्याने, यूलू डेक्स वायू प्रदूषण कमी करण्यातदेखील चांगले योगदान देईल, असा विश्वास आहे.

60 किमी रेंज

जर आपणाला यूलू डेक्सच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर यात 60 किमीची रेंज मिळते. यासह तुम्हाला लिथियम-ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. त्याची कमाल गती ताशी 25 किलोमीटर इतकी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. त्याचवेळी तुम्ही त्याच्यामागे 12 किलोपर्यंत वजन ठेवू शकता. ही स्कूटर अन्न, किराणा आणि औषध वितरणासाठी सर्वोत्कृष्ट आहे.

देशभरातील विविध महानगरांमध्ये ईव्ही सेवा पुरवठादार उपलब्ध

ईव्ही सेवा पुरवठादार देशभरातील विविध महानगरांमध्ये उपलब्ध आहे. मिराकल इलेक्ट्रिक दुचाकीवर उत्सर्जनमुक्त प्रवासाचे आश्वासन दिले जात आहे. यूलू आता विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कारण बजाज ऑटोने निर्मिती केलेले एक नवीन ईव्ही युलूच्या ताफ्यात सामील होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस कंपनी आपला सध्याचा ताफा 10,000 युनिट्सवरून 50,000 युनिट्सपर्यंत वाढणार आहे.

पाच-सहा उत्पादनांमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा विचार

लास्ट-माईल डिलिव्हरी स्कूटरव्यतिरिक्त यूलू आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार पाच-सहा उत्पादनांमध्ये करण्याचा विचार करीत आहे. यामागे वेगवेगळ्या सेवा देण्याचा उद्देश आहे. इलेक्ट्रिक स्कूटर विभागात, प्रत्येक कंपनी आजकाल आपली स्कूटर बाजारात लॉन्च करीत आहे. त्याचदरम्यान काही कंपन्यांकडून कमी किंमतीमध्ये इको फ्रेंडली तसेच हलक्या वजनाच्या स्कूटर बाजारात आणल्या जात आहेत. युलूनेही अशाच प्रकारे पाऊल टाकले आहे. युलूचा हेतू मार्केटमध्ये चांगला यशस्वी होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. (Yulu company today announced the launch of the electric scooter Yulu Dex)

इतर बातम्या

NIOS ODE 2021 : ओपन स्कूल दहावी आणि बारावीची ऑन-डिमांड परीक्षा 17 ऑगस्टपासून; जाणून घ्या सविस्तर तपशील

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.