AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्थसंकल्पात बिहार-आंध्रला मोठी भेट, केसी त्यागी आणि CM नायडूंनी दिली अशी प्रतिक्रिया

देशाचा अंर्थसंकल्प आज सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी मोठ्या घोषणा केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सहभागी असलेली टीडीपी आणि जेडीयू यांना खूश करण्यात आलं आहे. त्यावर दोन्ही राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पात बिहार-आंध्रला मोठी भेट, केसी त्यागी आणि CM नायडूंनी दिली अशी प्रतिक्रिया
budget 2024
| Updated on: Jul 23, 2024 | 3:38 PM
Share

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दोन्ही राज्यांसाठी तिजोरी उघडली आहे. त्यामुळे बिहारमध्ये सत्तेत असलेले JDU आणि आंध्रप्रदेशात सत्तेत असलेले TDP आनंदी आहेत. जेडीयूने बिहारसाठी केलेल्या घोषणेचे स्वागत केलेय. या अर्थसंकल्पामुळे राज्य “आत्मनिर्भर” होण्यास मदत होईल असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. त्यांन आंध्र प्रदेशसाठी केलेल्या घोषणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर बिहारमधील जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी एक्स्प्रेसवेसाठी 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि पूर निवारणाच्या पावलांसाठी 11,500 कोटी रुपयांचा निधी दिल्याने बिहारच्या “विशेष आर्थिक पाठिंब्याचे” कौतुक केले.

बिहारसाठी मोठ्या घोषणा

त्यागी म्हणाले की, राज्यात नवीन विमानतळ आणि वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आलीये. तसेच गंगा नदीवरील दोन नवीन पूलांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नालंदा विद्यापीठाच्या विकासासाठी आणि नालंदा-राजगीर कॉरिडॉरसह पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पावले उचलण्याची घोषणा केली. गया हे कोलकाता-अमृतसर कॉरिडॉरचे मुख्यालय असेल. ते म्हणाले की, बिहारला तीन नवे द्रुतगती मार्गही दिले आहेत जे राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जातील. राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यासाठी बिहार सरकारच्या प्रयत्नांना गती देण्यावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

याआधी मोदी सरकारने बिहारला विशेष दर्जा देणे शक्य नसल्याचे सांगितले होते, त्यानंतर आता या अर्थसंकल्पात बिहारला मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात बिहारला मोठे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये 26 हजार कोटी रुपयांचे तीन एक्स्प्रेस वे, 21 हजार कोटी रुपयांचे 2400 मेगावॅट पॉवर प्लांट, वैद्यकीय महाविद्यालये आणि अनेक विमानतळांचा समावेश आहे. अर्थसंकल्पात बिहारला आर्थिक मदत जाहीर केलीये. ‘गया’मध्ये औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनीही आनंद व्यक्त केला

अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी केलेल्या घोषणांवर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, राज्याच्या गरजा ओळखून आणि नवीन राजधानी अमरावतीसह राज्यातील अनेक विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल केंद्राचे आभार.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प 2024 मध्ये आंध्र प्रदेशच्या विकासासाठी अमरावतीच्या विकासासाठी 15,000 कोटी रुपयांसह अनेक उपायांची घोषणा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आंध्र प्रदेशच्या लोकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आमच्या राज्याच्या गरजा ओळखल्याबद्दल आभार मानतो. आर्थिक वर्ष 24-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राजधानी, पोलावरम, औद्योगिक नोड्स आणि आंध्र प्रदेशातील मागास भागांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.