Budget 2022| महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार, 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार- अर्थमंत्री

महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार असल्याचं सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितलं.

Budget 2022| महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार, 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार- अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 2:44 PM

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) यांनी आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षातील बजेट सादर केले. यात शेतकरी, तरुण, उद्योग, व्यावसायिकांसह, महिलांसाठी नव्या योजनांची घोषणा केली आहे. महिला सबलीकरणासाठी (Women Empowerment ) अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार असल्याचं सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितलं. तसेच देशातील 2 लाख आंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडीच्या रुपात अपग्रेड केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. अर्थमंत्री (Finance minister) निर्मला सीतारमण म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला जाईल. मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला जाईल.

आरोग्यसाठी ओपन प्लॅटफॉर्म

निर्मला सीतारमण बजेट सादर करताना म्हणाल्या, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टिमसाठी एक ओपन प्लॅटफॉर्म सुरु केला जाईल. या माध्यमातून हेल्थ प्रोव्हायडर्ससाठी डिजिटल रजिस्ट्रीज, युनिक हेल्थ आयडेंटिटी आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी युनिव्हर्सल अॅक्सेस मिळवता येईल.

इमर्जन्सी क्रेडिट लाइनचा विस्तार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरेंटी योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली जाईल. गॅरेंटी कव्हर 50,000 कोटी रुपयांवरून वाढवून एकूण 5 लाख कोटी रुपयांपर्यंत केले जाईल.

60 लाख नव्या नोकऱ्या देणार

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असेल. येणाऱ्या काळात लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र, या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील, त्यांच्यासाठी निधी कसा उपलब्ध असेल, याचा उल्लेख भाषणात नव्हता. कदाचित अर्थसंकल्पात याचा सविस्तर उल्लेख असू शकतो.

इतर बातम्या-

Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, ‘एमएसपी’ अंतर्गत 2 लाख 70 हजार कोटी रुपये देणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.