Budget 2022 : शेअर गुंतवणुकदारांना कर दिलासा की बोजा; टॅक्सचा ट्रिपल डोस हटविणार?

सध्या गुंतवणुकदार सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (Security Transaction Tax) अदा करत आहे. त्यामुळे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा (LTCG) दुहेरी भुर्दंड कशासाठी असा प्रश्न गुंतवणुकदारांनी उपस्थित केला आहे.

Budget 2022 : शेअर गुंतवणुकदारांना कर दिलासा की बोजा; टॅक्सचा ट्रिपल डोस हटविणार?
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 12:47 PM

नवी दिल्ली : कोविड काळात शेअर बाजारात (Share Market Investors) गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गुंतवणुकदारांच्या गंगाजळीत मोठी आर्थिक भर पडली. गेल्या दोन वर्षापासून गुंतवणुकदारांना आपल्या गुंतवणुकीवर कमाईचा गुणाकार दिसून आला. दरम्यान, शेअर बाजार गुंतवणुकदारांवर कॅपिटल गेन टॅक्सचा (Capital gain tax) अधिक भार पडत आहे. आगामी अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) मध्ये केंद्र सरकारकडून दिलासाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, शेअर बाजार गुंतवणुकदार लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समधून (LTCG) सुटका करण्याची मागणी करत आहे. सध्या गुंतवणुकदार सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (Security Transaction Tax) अदा करत आहे. त्यामुळे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा (LTCG) दुहेरी भुर्दंड कशासाठी असा प्रश्न गुंतवणुकदारांनी उपस्थित केला आहे. भारतात ट्रान्झॅक्शनसाठी मोठ्या प्रमाणात शुल्काचा भार आहे. त्यामुळे STT आणि LTCG दुहेरी करांमुळे मनोधैर्यावर परिणाम होत असल्याचे गुंतवणुकदारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण करमाफी किंवा कपात

स्वस्तिक इन्वेस्टमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील न्याती यांनी अर्थसंकल्पात LTCG, STT यासाठी करमाफीची मागणी केली आहे. केंद्र सरकार सर्व सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हटविणार नसल्यास किमान त्यामध्ये कपात करावी असा पर्याय न्याती यांनी सुचविला आहे. प्राथमिक टप्प्यावर STT ची आकारणी लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या स्वरुपात केली जात होती. मात्र, आता स्वतंत्रपणे LTCG ची वसूली केली जात आहे.

..कल वाढता वाढे!

भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीकडे सर्वांचा कल वाढीस लागला आहे. युवकांसोबत महिलांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे. शेअर बाजारात गुंतवणुकदारांचा कल टिकून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक पावले उचलण्याची अपेक्षा शेअर जगतातून केली जात आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने LTCG आणि STT माफ करावे. गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल. भारतात दोन्ही दरांमुळे गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत.

करांचा ‘ट्रिपल’ डोस

IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी भारतीय शेअर बाजार गुंतवणुकदारांना LTCG, STT स्वरुपात दुहेरी करांचा मारा सहन करावा लागत आहे. दोन्ही करांची पूर्तता केल्यानंतर गुंतवणुकदारांना शेअर बाजारातील कमाईवर तीन टप्प्यांत कर आकारणी केली जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुंतवणुकदारांच्या मागण्यांचा विचार करून LTCG मधून मुक्तता द्यावी असे गुप्ता यांनी अर्थसंकल्प पूर्व शिफारशित म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

कोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा…

नोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा 

Budget 2022: ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल, बजेटमध्ये ‘डिजिटल फंड’?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.