Union Budget 2022 : साडी में साडी हँडलूमची सिल्क साडी! बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! किंमत किती?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज त्यांच्या कार्यकाळात चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. अर्थसंकल्पासोबतच दरवर्षी ज्याची चर्चा होते ती म्हणजे अर्थमंत्र्यांची साडी. सीतारमण दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना हातमागाचा (Handloom Sarees) प्रचार करताना दिसतात.
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज त्यांच्या कार्यकाळात चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. अर्थसंकल्पासोबतच दरवर्षी ज्याची चर्चा होते ती म्हणजे अर्थमंत्र्यांची साडी. सीतारमण दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना हातमागाचा (Handloom Sarees) प्रचार करताना दिसतात. यावेळीही निर्मला सीतारमण यांनी तपकिरी रंगाची साडी नेसली होती. संसदेत अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी हातमागाची रेशमी साडी परिधान केली होती. ब्राऊन कलरच्या साडीवर मॅचिंग असा मरून कलरचा ब्लाउज परिधान केला होता. त्याचबरोबर निर्मला सीतारमण यांच्या या साडीवर प्रिंट्सदेखील होत्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची दरवर्षीची साडी खूप खास असते. 2019 पासून आतापर्यंत प्रत्येक बजेट सादर करतेवेळी त्यांनी खास साडी नेसली होती. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती 2020 मध्ये त्यांनी नेसलेल्या साडीची. निर्मला सीतारमण यांनी 2020 मध्ये संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पिवळी कांजीवरम साडी निवडली होती. ज्यावर सोनेरी किनार बनवली होती. कांजीवरम सिल्कची ही साडी खूपच भारी दिसत होती. त्याचवेळी, 2019 मध्ये आपला पहिला अर्थसंकल्प सादर करतेवेळी अर्थमंत्र्यांनी गुलाबी रंगाची साडी निवडली होती. ज्यावर सोनेरी किनार बनवली होती.
पेपरलेस अर्थसंकल्पाची नवी परंपरा
2021 मध्ये अर्थमंत्री लाल रंगाच्या पॅकेटमध्ये बहिखात्याऐवजी (कागदी दस्तऐवज) टॅब्लेट घेऊन संसदेत पोहोचल्या. ज्यामध्ये सर्व कागदपत्रे (सॉफ्ट कॉपी/पेपरलेस अर्थसंकल्प) होती. निर्मला सीतारामन यांनी 2021 च्या बजेटसाठी क्रिस्प रेड कलरची साडी निवडली होती. ज्यावर ऑफ-व्हाइट कलर डिटेलिंग केले होते. त्याच वेळी त्यावर सोनेरी जरीची बॉर्डर होती. पोचमपल्ली हातमागाच्या साड्यांवर प्रिंट्सही होत्या. सर्वसामान्य नेत्यांप्रमाणेच निर्मला यांनी सोन्याची साखळी आणि लहान कानातले घातले होते. जे त्यांच्या लूकमध्ये अधिक भर घालण्याचं काम करत होते.
नवीन विचार आणि संस्कृतीची योग्य सांगड
निर्मला सीतारमण या नेहमीच साडीत नेसतात. त्यांच्या साड्यांचे रंगही भडक नसतात. त्या नेहमी डोऴ्यांना सुखावतील अशा रंगाच्या साड्या निवडतात. जसे, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा इत्यादी. त्या हँडलूमच्या साड्या घालतात. अनेकदा त्या सूती साड्याही नेसतात. अर्थमंत्री या जास्त दागिनेही परिधान करत नाहीत. त्या सोन्याचा एक कडा, चैन आणि कानात छोटे कानातले घालतात.
निर्मला सीतारमण यांना आंध्र प्रदेशची पोचमपल्ली साडी फार आवडते. तसेच, त्यांच्याकडे जामदानी साड्याही आहेत. या साड्या बंगालमध्ये तयार होतात. कामाकाजावेळी निर्मला सीतारमण या कोटा डोरियाच्या सिल्क साड्या परिधात करतात. सीतारमण ज्या प्रकारच्या साड्या वापरतात या साड्या 1000 रुपयांपासून ते 12000 रुपयांमध्ये मिळतात. तर प्योर हँडलूम साड्यांची किंमत 4000 रुपयांपासून सुरु होते.
Union Finance Minister Nirmala Sitharaman along with Ministers of State for Finance, Dr Bhagwat Kishanrao Karad, Shri Pankaj Chaudhary, and senior officials of the Ministry of Finance, called on President Ram Nath Kovind before presenting the Union Budget 2022-23. pic.twitter.com/7JNZt3rOPj
— ANI (@ANI) February 1, 2022
इतर बातम्या
Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?
नवीन SUV खरेदी करताय? पाहा टाटा, मारुती, ह्युंडईचे एकापेक्षा एक पर्याय, किंमत 5.64 लाखांपासून