Budget 2023-2024: तुम्ही बक्कळ आयकर भरता; पण जिथे इन्कम टॅक्सच भरला जात नाही असे 12 देश माहीत आहेत काय?

इन्कम टॅक्स हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा एक मुख्य भाग असतो. भारतात लोकांच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजे जे लोक जास्त कमाई करतात त्यांना जास्त कर लागतो.

Budget 2023-2024: तुम्ही बक्कळ आयकर भरता; पण जिथे इन्कम टॅक्सच भरला जात नाही असे 12 देश माहीत आहेत काय?
income taxImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली: मोदी सरकार आज आपल्या दुसऱ्या टर्ममधील पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून विविध घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या 9 वर्षापासून इन्कम टॅक्स स्लॅब बदलण्यात आला नाही. त्यामुळे मोदी सरकार जाता जाता इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग आजच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसला आहे. भारतात नोकरदार वर्ग, उद्योजक, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आयकर भरावा लागतो. पण जगातील 12 असे देश आहेत की, जिथे आयकरच भरला जात नाही.

इन्कम टॅक्स हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा एक मुख्य भाग असतो. भारतात लोकांच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजे जे लोक जास्त कमाई करतात त्यांना जास्त कर लागतो. मात्र, जगातील काही असे देश आहेत की जिथे करतच आकारला जात नाही. या देशांमध्ये आखाती देशातील यूएई आणि ओमानचाही समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

द बहमास

पर्यटकांचा स्वर्ग समजला जाणारा द बहमास देश हा वेस्टर्न हेमिस्फियरमध्ये आहे. या देशाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या देशातील नागरिकांना कर भरावा लागत नाही.

यूएई

संयुक्त अरब अमिरात आखाती देशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. यूएईची अर्थव्यवस्था तेल आणि पर्यटनामुळे प्रचंड मजबूत आहे. त्यामुळेच यूएईच्या लोकांना आयकरातून सवलत देण्यात आली आहे.

बहरीन

आखाती देश असलेल्या बहरीनमधील नागरिकांना आपल्या कमाईतील एक पैही कर म्हणून भरावी लागत नाही. बहरीन सरकार जनतेकडून कर वसूल करत नाही

ब्रुनेई

तेलाचं भांडार असलेला ब्रुनेई इस्लामिक किंगडम साऊथ ईस्ट आशियात आहे. येथील लोकांनाही कोणत्याही प्रकारे कर भराव लागत नाही.

कॅमेन आयलँड्स

कॅमेन आयलँड्स हा देश उत्तर अमेरिकेच्या महाद्वीपावरील कॅरेबियन क्षेत्रात आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी ही जागा आहे. हजारो लोक या देशात सुट्टी घालवण्यासाठी येतात. विशेष म्हणजे या देशातही येथील नागरिकांकडून कर वसूल केला जात नाही.

कुवैत

कुवैत हा सुद्धा आखाती देश आहे. बहरीनप्रमाणे या देशातील लोकांनाही कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

ओमान

बहरीन आणि कुवैतनंतर ओमानही या यादीत समाविष्ट आहे. ओमानचे नागरिक कर भरत नाही. कारण ओमानमधील तेलाचे भंडार आणि गॅस सेक्टरमुळे येथील नागरिकांना कर भरण्याची गरजच पडत नाही.

कतार

ओमान, बहरीन आणि कुवैत प्रमाणेच कतारमध्येही कर भरला जात नाही. कतार ऑयल सेक्टरमध्ये प्रचंड मजबूत आहे. हा देश छोटा आहे. पण येथील लोक गर्भश्रीमंत आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांकडून कर वसूल केला जात नाही.

मालदीव

भारतच नव्हे तर जगभरातून लोक मालदीवला फिरायला येतात. समुद्राच्या तटावर असलेला हा देश म्हणजे पर्यटकांचं बेस्ट डेस्टिनेशन आहे. येथील नागरिकही कर भरत नाही.

मोनाको

यूरोपातील मोनाको हा देश खूप लहान आहे. तरीही येथील नागरिकांकडून कर वसूल केला जात नाही. त्यांना आयकर भरावा लागत नाही.

नौरू

नौरू जगातील सर्वात छोटं द्वीप राष्ट्र आहे. या देशाचं श्रेत्रफळ केवळ 8.1 वर्ग मीटर आहे. नौरूच्या नागरिकांकडूनही आयकर वसूल केला जात नाही.

सोमालिया

ईस्ट ऑफ्रिकन देश सोमालिया सुद्धा टॅक्स फ्री देश आहे. मात्र, सोमालियाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या देशात बाहेरची व्यक्ती राहण्याची इच्छाही व्यक्त करू शकत नाही, एवढी या देशाची परिस्थिती वाईट आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.