Budget 2022 | झिरो बजेट शेती ते केमिकल मुक्त शेती, मोदी सरकारच्या बजेटमध्ये शेतीचा रोड मॅप काय?

पाच राज्यांतील निवडणुका तसेच शेतकरी (Farmer) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Budget 2022) शेतकऱ्यांसाठी भरघोस अशा योजना आणि आर्थिक तरतूद केली आहे. केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात ग्रामाणी भागातील तरुणांना शेतीसंबंधीच्या स्टार्टअप्सना नाबार्डतर्फे मदत करणार आहे. तसेच 'किसान ड्रोन'च्या माध्यमातून पिकांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

Budget 2022 | झिरो बजेट शेती ते केमिकल मुक्त शेती, मोदी सरकारच्या बजेटमध्ये शेतीचा रोड मॅप काय?
nirmala sitaraman on budget
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 12:48 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुका तसेच शेतकरी (Farmer) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Budget 2022) शेतकऱ्यांसाठी भरघोस अशा योजना आणि आर्थिक तरतूद केली आहे. केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील तरुणांना शेतीसंबंधीच्या स्टार्टअप्सना नाबार्डतर्फे मदत करणार आहे. तसेच ‘किसान ड्रोन’च्या माध्यमातून पिकांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या आर्थिक वर्षात सेंद्रीय (Organic Farming) तसेच रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. विशेष म्हणजे देशातील सर्व कृषी विद्यापीठांना आधुनिक, झिरो बजेट तसेच तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी अभ्यासक्रम आखण्याचे सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारने यावेळी शेतकऱ्यांना एमएसपीअंतर्गत तब्बल 2.7 लाख कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

सेंद्रीय शेती, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार

केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतीसाठी भरीव मदत दिली आहे. तसेच यावेळी जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी जलसिंचन योजनेतून तब्बल 9 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारकडून यावर्षी सेंद्रीय शेती, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

तेलबियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार

ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेतीशी निगडीत असलेल्या स्टार्टअप्सना फंड दिला जाणार आहे. तसेच तेलाच्या भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलाबीयाच्या आयातीवर अवलंबून न राहण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना तेलबियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांची अमंलबजावणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त, डिजिटल सुविधा देण्यासाठी पीपीपी पद्धतीने योजना आखल्या जाणार आहेत.

किसान ड्रोनचा वापर, झिरो बजेट शेतीसाठी अभ्यासक्रम 

पिकांचे मूल्यमापन व्हावे यासाठी किसान ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून औषधी, किटकनाशक तसेच न्यूट्रीशन्स फवारणीसाठीदेखील ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रोत्सहित केले जाणार आहे. कृषी विद्यापीठांना झिरो बझेट शेती, ऑरगॅनिक फार्मिग, आधुनिक शेतीचा प्रसार तसेच प्रचार व्हावा अभ्यासक्रम तयार करण्याचे सांगितले जाणार आहे.

इतर बातम्या :

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू

Budget 2022 : मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होणार? केंद्र सरकार कस्टम ड्युटीत कपात करण्याची शक्यता

BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.