पहिल्या दहा महिन्यातच देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांतच म्हणजेच 2021-22 मध्ये भारताची कृषी उत्पादनांची निर्यात 40. 87 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. निर्यातीमधील ही आकडीवारी आहे ती, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यातील म्हणजेच एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 मधील आहे. 

पहिल्या दहा महिन्यातच देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 6:30 PM

मुंबईः कृषी प्रधान असलेला भारत आता शेती क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा एक वेगळा आदर्श घालून देत आहे. ज्यामुळे भारतात अन्नधान्य आणि शेती उत्पादनात (Agricultural production) आता नवा विक्रम करताना दिसत आहे. भारतातील शेती उत्पादने आणि अन्नधान्यामुळे जगाची भूक भागवली जात आहे. शेतकऱ्यांची ही मेहनत भारतील अर्थव्यवस्थेला (Economy) मजबूत बनवत असल्याची माहिती, केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आधीच म्हणजेच दहा महिन्यांमध्ये भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Export) 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्री अनुप्रिया सिंग-पटेल यांनी बुधवारी एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी माहिती सांगितली की, 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यातच कृषी उत्पादनांच्या निर्यात ही 40.87 अरब डॉलर एवढी पोहचली आहे. आणि ही आकडेवारी एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यातीलच आहे. तसेच यावेळी त्यांनी हेही सांगितले की, मागील वर्षी या काळात भारताच्या कृषी उत्पादनांची निर्यातमध्ये 32.66 बिलियन अमेरिका डॉलर पर्यंत झाली होती.

गहू, साखर आणि कापूस निर्यातीत वाढ

राज्यमंत्री असलेल्या अनुप्रिया सिंह पटेल यांनी लोकसभेत सांगितले की, चालू आर्थिक वर्षात मुख्य शेती उत्पादने म्हणजेच गहू, साखर आणि कापूस या उत्पादनांच्यामुळे निर्यातीत वाढ झाली होती. तसेच मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, ज्या उत्पादनांच्या बाबतीत लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यामध्ये कडधान्य, कॉफी, मांस, दूध आणि पोल्टी उत्पादने आणि समुद्रातील उत्पादनांची निर्यात जेवढे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले होते, त्याच्याजवळ आपण पोहचलो होतो.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

भारतातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची निर्यात वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, त्यामुळे त्यांच्या शेतीवर त्याचा सकारात्मक प्रभावही पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, निर्यातीमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो हे निश्चित करण्यासाठी उत्पादन संघटना आणि सहकार तत्वार काम करणाऱ्या समित्या आहेत, त्यांनी निर्यातीबाबत चर्चा करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी किसान कनेक्ट पोर्टल लाँच केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

Karnataka Halal Meat Row: ‘हलाल’ मटण म्हणजे ‘आर्थिक जिहाद’च, भाजप नेत्याचं वक्तव्य, हिजाबनंतर कर्नाटकात आता नवा वाद

Pune airport| पुण्यात लोहगाव विमातळावर विमानाचे टायर फुटले ; काही तासानंतर वाहतूक पूर्ववत

Akola Water Crisis : नुसतीच बडी बडी नावं, 40 वर्षांपासून पाणी नाही, अकोल्यात महिलांचा एल्गार

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.