अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी
gautam adani
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 8:53 AM

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी उद्योगाचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपन्याची चांगलीच भरभराट झाली. आता अदानी यांनी आपले लक्ष दक्षिण भारतातील महत्वाचे बंदर असलेल्या विझिंजमकडे केंद्रीत केले आहे. या ठिकाणावरील गुंतवणूक अदानी वाढवणार आहे. ही गुंतवणूक जवळपास 20 हजार कोटी रुपयांची करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून विझिंजम बंदराचा विस्तार आणि विकास करण्याचा प्रयत्न आहे. जगातील मोठी जहाज या ठिकाणी येऊ शकतील, या पद्धतीने या बंदराचा विकास या बंदरचा अदानी ग्रुप करणार आहे.

बंदराची क्षमता पाच पट वाढणार

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडचे एमडी करण अदानी यांनी सांगितले की, 2028 पर्यंत विझिंजम आंतरराष्ट्रीय ट्रांसशिपमेंट टर्मिनलमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आहे. त्यामुळे या बंदराची क्षमताही पाच पट वाढणार आहे. या बंदराचे काम 2045 पर्यंत करण्याचे होते. परंतु आता हे काम 2028 पर्यंतच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनमधील समुद्र व्यापार भारताकडे घेता येणार आहे.

गुंतवणूक रक्कम केली दुप्पट

दक्षिण भारतात असलेल्या विझिंजम बंदर हे आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांचा जवळ आहे. त्या ठिकाणी मोठे जहाज सहज येऊ शकतात, असे शिपिंग चॅनल आहेत. अदान ग्रुप या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. परंतु आता ही रक्कम दुप्पट करत वीस हजार कोटी करण्यात आली आहे. त्यात जहाज इंधन सुविधा, एक लक्झरी क्रूझ टर्मिनल आणि दोन मिलियन टन सिमेंट दळणारे युनिट आहे.

हे सुद्धा वाचा

चीनला मिळणार मोठे आव्हान

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर मोठे जहाज येऊ शकतील. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यास आव्हान देता येणार आहे.

विझिंजम बंदराच्या कामाचे उद्धघाटन मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात झाले होते. अदानी ग्रुपचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सध्या मोठे जहाज भारतीय बंदरांमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे ते कोलंबो, दुंबई, सिंगापूर या शहरांची निवड करतात. परंतु विझिंजम बंदराचे काम पूर्ण झाल्यावर ही अडचण दूर होणार आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.