कोरोना महामारीत लस उत्पादन करणारी कंपनी मालामाल, सीरमचा नफा तब्बल…………

स्टिलपासून ऑटोमोबाईलपर्यंत, आणि फर्निचरपासून ते रिअल इस्टेटपर्यंत, साऱ्या धंद्यात मंदी आहे. मात्र औषधांच्या व्यवसायानं आजवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत (Serum Institute earns crores of rupees through vaccine)

कोरोना महामारीत लस उत्पादन करणारी कंपनी मालामाल, सीरमचा नफा तब्बल............
Adar Poonawlla
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 8:10 PM

मुंबई : स्टिलपासून ऑटोमोबाईलपर्यंत, आणि फर्निचरपासून ते रिअल इस्टेटपर्यंत, साऱ्या धंद्यात मंदी आहे. मात्र औषधांच्या व्यवसायानं आजवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. त्यात सर्वात आघाडीवर आहे, ते म्हणजे पुण्यातलं ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘. सीरम इन्स्टिट्यूटनं (Serum Institute) लसीद्वारे किती कमाई केली, याची आकडेवारी कॅपटिलाईनचा दाखला देऊन ‘बिजनेस टूडे’नं प्रसिद्ध केलीय (Serum Institute earns crores of rupees through vaccine).

औषध निर्मिती कंपन्यांमध्ये सीरमला सर्वाधिक नफा

2019-20 या आर्थिक वर्षात सीरमला एकूण उत्पन्न 5 हजार 926 कोटी मिळालं. आणि यातला निव्वळ नफा हा तब्बल 2 हजार 251 कोटी रुपये इतका होता. म्हणजे एकूण उत्पन्नात नफ्याचं प्रमाण होतं थेट 41.3 टक्के इतकं होतं. गेल्या वर्षात औषध निर्मितीतल्या 418 कंपन्यांनी 5 हजार कोटींहून जास्त उत्पन्नांची घोषणा केली होती. मात्र यात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी सुद्धा सीरमच ठरल्याचं बोललं जातंय (Serum Institute earns crores of rupees through vaccine).

सीरमचा नफा कसा वाढला?

एका आकडेवारीत मागच्या काही वर्षात सीरमचा नफा कसा वाढला, याचाही दाखला दिला गेलाय. 2013 मध्ये सीरमचा नफा हा 1741 कोटी इतका होता. 2016 मध्ये त्यात वाढ होऊन तो 2057 कोटी इतका झाला आणि 2019-20 सालात तोच नफा 2251 कोटींवर गेला.

सीरमचं लसीच्या उत्पादनावर लक्ष

पहिल्या लाटेनंतर कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात धाकधूक होती. मात्र दुसऱ्या लाटेनंतर चित्र बदललं. लस घेऊनही कोरोना होत असला, तरी लसीमुळे कोरोनाचा त्रास कैक पटीनं कमी होतोय, हे लक्षात आल्यानंतर लोकांनी लसीसाठी रांगा लावल्या. म्हणूनच सीरमनंही आता लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलंय.

सीरम केंद्र आणि राज्य सरकारला लस किती रुपयांना विकते?

सीरमच्या लसीचा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांमध्ये पुरवठा होतोय. केंद्राला 200 रुपये प्रमाणे सीरमची लस मिळतेय. राज्य सरकारला 300 रुपये तर खासगी दवाखान्यांना 600 रुपये प्रमाणे एक डोस दिला जातोय. त्यामुळे जर भविष्यात सीरमनं 50 कोटी डोस विकले, तर सीरम शब्दशः मालामाल होणार आहे.

…तर सीरमला 15 हजार कोटींचं उत्पन्न

300 रुपये प्रमाणे जर सीरमनं 50 कोटी डोसची विक्री केली, तर त्यातून सीरम कंपनीला तब्बल 15 हजार कोटींचं उत्पन्न होणार आहे. कोव्हिशिल्ड लसीची मागणी पाहता सीरमचे अध्यक्ष अदर पुनावालांनी 2.5 अब्ज डोसचं टार्गेट ठेवलंय. मात्र ते उत्पादनही कमी पडलं, तर सीरम वर्षाला 3 अब्ज डोसची सुद्धा निर्मिती करु शकते.

सीरम पाठोपाठ ‘या’ कंपन्यांनाही चांगला नफा

5 हजार कोटींचा व्यवसाय करुन 41 टक्के नफा कमावणारी सीरम एकमेव कंपनी आहे. त्यानंतर मॅक्लेओड्स फार्मास्युटिक्लनं 28 टक्के नफा मिळवलाय. डिवीस लॅब्रोटरिजनं 26 टक्के नफा कमावलाय. त्यानंतर सन फार्मानं 24 टक्के, तर इंटास फार्मास्युटिकल्सनं 15 टक्के नफा मिळवलाय.

प्रत्येकाला पैशांपेक्षा जीव महत्वाचा

लस उत्पादनात कंपनीला साहजिकपणे नफा होणार, हे पुनावालांनी याआधीच स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे सीरमचा आर्थिक फायदा आश्चर्यकारक मानला जात नाहीय. शेवटी सध्या प्रत्येकाला पैशांपेक्षा जीव महत्वाचा आहे आणि सध्याच्या काळात लोक जेवणापेक्षा गोळ्या-औषधी जास्त घेतायत.

हेही वाचा :

कोरोना संकटातही ‘या’ क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या किती फायदा?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.