AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक निकालानंतर शेअर बाजार सुसाट…Sensex -Nifty चा नवा विक्रम…अदानीचे शेअर तेजीत

stock market all time high: पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. सोमवारी सकाळी बाजार ऑल टाईम हायवर गेला. शेअर बाजारात अदानी कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच वाढ झाली. शेअर बाजार वाढीची तीन प्रमुख कारणे होती....

निवडणूक निकालानंतर शेअर बाजार सुसाट...Sensex -Nifty चा नवा विक्रम...अदानीचे शेअर तेजीत
| Updated on: Dec 04, 2023 | 11:58 AM
Share

मुंबई | 4 डिसेंबर 2023 : विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने नवीन विक्रम केला. सेन्सेक्स ऑल टाईम हायवर पोहचला. चार पैकी तीन राज्यांत भाजपला विजय मिळाल्यानंतर सर्वाधिक फायदा अदानी ग्रुपच्या शेअरला झाले. अदानी ग्रुपमधील एंटरप्राइजेज शेअर सहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. शेअर बाजारात वाढीला निवडणूक निकाल हे एक कारण असले तरी आणखी इतर कारणेही आहे. बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदार मालमाल झाले आहे. प्री ओपनिंग सेशन दरम्यान बाजारात चांगली वाढ दिसत होती. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 1014.01 वाढला होता.

सेन्सेक्समध्ये रेकॉर्ड वाढ

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सोमवारी शेअर बाजार विक्रमासह उघडला. सेन्सेक्स 68,587.82 वर जाऊन पोहचला. सेन्सेक्स ऑल टाइम हायवर गेला असताना निफ्टीसुद्धा 20,602.50 वर गेला. सेन्सेक्समध्ये जवळपास 1000 अंकाची तर निफ्टीमध्ये 300 अंकांची वाढ झाली. बीएसई Sensex 1.31 टक्के वाढीस ओपन झाला. पाच राज्यातील निवडणूक निकालाचा परिणाम दिसला. Adani Group चे शेअर बाजारात तेजीत होते. Adani Enterprises Share 7.04 टक्के म्हणजे 166.30 रुपयांनी वाढले होते. हा शेअर 2,529 वर पोहचला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरमध्ये 79.00 म्हणजेच 7.70% वाढ होती.

का झाली वाढ

  • पाच पैकी तीन राज्यांत भाजपला मिळालेले बहुमत
  • दुसऱ्या तिमाहीत GDP 7.6%, आरबीआयने GDP वाढ 6.5% टक्के दाखवली होती. परंतु 1.1% जास्त वाढ झाली.
  • अमेरिकन शेअर बाजार शुक्रवारी वाढीसह बंद झाला होता.

मार्केट कॅपिटल 4.09 लाख कोटींनी वाढले

बाजारात आलेल्या तेजीमुळे मार्केट कॅपिटलमध्ये 4.09 लाख कोटींनी वाढ झाली आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल 4.09 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटींवर गेले आहे. सेन्सेक्समध्ये 30 शेअरपैकी 29 शेअर तेजीत होते. केवळ मारुतिी कंपनीचे शेअरमध्ये घसरण होती. या शेअरमध्ये 0.36% घसरण होती. परंतु अदानी ग्रुपचे सर्व 10 शेअर तेजीत होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.