अनिल अंबानींची सून मुकेश अंबानींच्या सुनेला देते टक्कर, राधिका मर्चंटपेक्षाही अधिक कृषा…
Khrisha Ambani and Radhika Merchant : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे नुकताच प्री वेडिंग फंक्शन हे पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी गेल्या काही दिवसांपासून सतत तूफान चर्चेत असणारे एक नाव आहे.
मुंबई | 21 मार्च 2024 : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा प्री वेडिंग समारंभ नुकताच झाला. या समारंभात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची चांगलीच चर्चा झाली. जगभरातील दिग्गज या प्री वेडिंग समारंभासाठी आले होते. त्यावेळी आणि त्यानंतरही राधिका मर्चंट हिचा स्टाईल आणि क्यूटनेसची चांगलीच चर्चा झाली. तिचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले. परंतु मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांची सूनही सुंदर आहे. तिचे नाव आहे कृषा अंबानी.
मोठ्या परिवारात आल्यानंतर कृषा साधीच
कृषा ही अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांची सून आहे. अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल याची ती पत्नी आहे. अंबानी परिवारात आल्यानंतर कृषाचा साधेपणा कुणाच्याही मनाला भिडणारा आहे. तिचे सौंदर्य आणि फॅशन सेन्सबद्दल राधिका मर्चंटपेक्षा कमी नाही. कृषाचे फोटो पाहिल्यावर कोणाच्या ते सहज लक्षात येईल. उद्योग सांभाळण्याबरोबर सामाजिक कार्यात ती सक्रीय आहे.
2022 मध्ये जय अनमोलसोबत लग्न
अनंत आणि राधिकाचे लग्न 2024 मध्ये होत आहे. त्याची चर्चा माध्यमांमध्ये चांगलीच झाली. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या जय अनमोल याच्या लग्नाची चर्चा झाली नाही. 2022 मध्ये कृषा हिचे जय अनमोलसोबत लग्न झाले. तिचे लग्नापूर्वीचे नाव कृषा शाह आहे. ती मुंबईतच वाढली. ती सामाजिक कार्यात चांगलीच सक्रीय आहे.
लंडनमध्ये घेतली अर्थशास्त्राची पदवी
कृषाची आई निलम फॅशन डिजाइनर आहे. तिचे वडील निकुंज शाह हे निकुंज एंटरप्राइजेजचे अध्यक्ष होते. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. कृषाचे शिक्षण लंडनमध्ये झाले. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये सामाजिक नीती आणि विकास या विषयात पदवी घेतली. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर उद्योग सुरु करण्यासाठी भारतात आली.
राधिका मर्चंट आणि कृषा अंबानी
कृषाचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. कृषा या फोटोंमध्ये जबरदस्त अशी लूकमध्ये नक्कीच दिसत आहे. अनिल अंबानी यांच्या सुनेच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. कृषा आणि रााधिका या दोघींचीही राहण्याची पद्धत ही लोकांना आवडताना दिसत आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.