महिलेने उभारले ₹7,000 कोटींचे बिझनेस एम्पायर, मग आपल्याच कंपनीतून तिला काढले, कारण…
अंकिती बोस यांनी कंपनीतील संचालकांवर कायदेशीर खटला दाखल केला आहे. त्या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. ही कंपनी मल्टीनेशनल टेक्नोलॉजी आणि कमर्शियल स्टार्टअप आहे. झिलिंगो कंपनीचे मूल्यांकन 2019 मध्ये 7,000 कोटींपर्यंत गेले होते.
झिलिंगो कंपनीची माजी सीईओ अंकिती बोस सध्या चर्चेत आहेत. अंकिता बोस यांना आपल्याच कंपनीविरुद्ध कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक असोसिएट्सवर कायदेशीर खटला दाखल केला आहे. कधीकाळी कंपनीला मोठे यश मिळवून देणाऱ्या अंकिती बोस यांना त्यांच्या कंपनीने काढून टाकले आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप ठेवून त्यांना सीईओ पदावरुन काढून टाकले. कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाच्या आरोपांमुळे झिलिंगोचे सीईओ म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. आता कंपनीविरुद्ध त्यांचा कायदेशीर लढा सुरु आहे.
मुंबईत झाले शिक्षण
डेहराडूनमध्ये जन्मलेल्या अंकिती बोस यांनी झिलिंगो कंपनीया यशाच्या शिखरावर नेले होते. त्यांनी शालेय शिक्षण मुंबईत केले. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बंगळूरमधील मॅकिन्से अँड कंपनी आणि सिकोइया कंपनीत नोकरी केले. त्यांना अनेक दुकानदार ऑनलाइन नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्या कंपनीतून गुंतवणूक सल्लागार राजीनामा देऊन स्वत:ची झिलिंगो कंपनी स्थापन केली. त्यांनी ध्रुव कपूरसोबत काम सुरु केले.
कंपनीतून का काढले
कंपनीला नवीन उंचीवर नेल्यानंतर अंकिती बोस यांना 2022 मध्ये त्यांच्या स्टार्टअपमधून त्यांना काढून टाकण्यात आले. कंपनीत आर्थिक अनियमतता आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनी संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय आपले वेतन दहा पटीने वाढवला. तसेच विविध विक्रेत्यांना एक कोटी डॉलरची भरपाई दिल्याचा त्यांचावर आरोप आहे. गुंतवणूकदार महेश मूर्ती यांनी त्यांच्यावर 738 कोटी रुपयांचा खटला त्यांच्यावर सुरु आहे.
कंपनीतील संचालकांवर दाखल केला खटला
अंकिती बोस यांनी कंपनीतील संचालकांवर कायदेशीर खटला दाखल केला आहे. त्या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. ही कंपनी मल्टीनेशनल टेक्नोलॉजी आणि कमर्शियल स्टार्टअप आहे. झिलिंगो कंपनीचे मूल्यांकन 2019 मध्ये 7,000 कोटींपर्यंत गेले होते. त्यात अंकिती बोस यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे 2018 मध्ये फोर्ब्स अशियाच्या 30 अंडर 30 लिस्टमध्ये त्यांचा समावेश होता. तसेच 2019 मध्ये फॉर्च्यूनच्या 40 अंडर 40 आणि ब्लूमबर्ग टॉप 50 जणांमध्ये त्यांनी स्थान मिळवले होते.