AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी?

आता तुम्हाला या ओटीपीसह तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर जावे लागेल आणि एटीएम स्क्रीनवर कॅश ऑन मोबाईल पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका आणि रक्कम टाका.

ATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी?
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 1:39 PM
Share

नवी दिल्ली : तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल आणि पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते. बँकेने या सुविधेला कॅश ऑन मोबाईल असे नाव दिलेय, यासाठी तुमच्या फोनमध्ये बँक ऑफ बडोदाचे एम-कनेक्ट प्लस अॅप असणे आवश्यक आहे. या अॅपद्वारे तुम्ही देशातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढू शकता.

बँक ऑफ बडोदा कॅश ऑन मोबाईल सेवा

>> बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना फक्त BOB M-Connect Plus अॅप उघडणे आणि कार्डलेस व्यवहारासाठी OTP जनरेट करणे आवश्यक आहे. >> सर्वप्रथम एम-कनेक्ट प्लस अॅपवर लॉगिन करा आणि प्रीमियम सर्व्हिसेस टॅबवर टॅप करा. >> Cash on Mobile Service वर क्लिक करा. >> आता तुमचा खाते क्रमांक निवडा, रक्कम टाका आणि सबमिट करा. >> विनंती सबमिट केल्यानंतर बँक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवते.

बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून ‘या’ पद्धतीनं पैसे काढा

आता तुम्हाला या ओटीपीसह तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर जावे लागेल आणि एटीएम स्क्रीनवर कॅश ऑन मोबाईल पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका आणि रक्कम टाका.

नव्या वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार

नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे महागात पडणार आहे. एटीएममधून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बँक 1 जानेवारीपासून बदल करणार आहे. यामध्ये ट्रान्झेक्शनच्या शुल्क वाढीचाही समावेश आहे. एटीएम फ्री ट्रान्झेक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झेक्शनवरील शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिलीय. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झेक्शनवर 1 जानेवारीपासून अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी?

सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.