बंधन बँकेने जवानांसाठी सुरु केलं सॅलरी अकाऊंट, खास आहेत सुविधा

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधन बँक भारतीय सैनिकांसाठी शौर्य पगार खातं सुरू करणार आहे.

बंधन बँकेने जवानांसाठी सुरु केलं सॅलरी अकाऊंट, खास आहेत सुविधा
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:05 PM

नवी दिल्ली : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणि योजना आणत असतं. अशात आता बंधन बँकनेही (bandhan bank) त्यांच्या ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधन बँक भारतीय सैनिकांसाठी शौर्य पगार खातं सुरू करणार आहे. यासाठी बंधन बँकेने सैन्याबरोबर सामंजस्य करारही केला आहे. हे खातं खास सैन्यातील जवानांसाठी (army personnel) असणार आहे. त्यामध्ये त्यांना अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. (bank news army news bandhan bank start shaurya salary account for army personnel)

नवी दिल्लीतील बंधन बँक आणि भारतीय सैन्यात सामंजस्य करार झाला. या करारासाठी लेफ्टन जनरल हर्ष गुप्ता उपस्थित होते. लष्कराकडून एमओयूवर सैन्याचे डीजी लेफ्टन जनरल रवीन खोसला आणि बंधन यांच्या वतीने एमडी आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांनी करारावर सह्या केल्या. या कराराअंतर्गत सैन्याचे जवान सेव्हिंग अकाऊंट म्हणजेच सॅलरी अकाऊंट उघडून देणार आहे. या खात्याचं नाव शौर्य सॅलरी असं ठेवण्यात आलं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, या करारामुळे सैन्याच्या जवानांना बचत खात्यासह अनेक सुविधा मिळणार आहेत. सगळ्यात खास बाब म्हणजे खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 6 टक्के व्याज दिलं जाईल. तर बँकेच्या सर्व ATM वर मोफत अमर्यादित सेवा मिळणार आहे. या खात्यामध्ये NEFT, RTGS, IMPS आणि DD ची सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

जवानांसाठी आणखी खास बाब म्हणजे बंधन बँक खातेदारांना ठेव रकमेची सुरक्षा हमी देत आहे. तर या खास खात्यामध्ये 30 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमादेखील मिळणार आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या खात्यामध्ये खातेधारकांना 1 कोटींचा हवाई अपघात कव्हर दिला जाणार आहे. म्हणजेच जर खातेदार एखाद्या हवाई दुर्घटनेत मरण पावला तर नोमिनी व्यक्तीला एक कोटी रुपयांची रक्कम बँकेकडून देण्यात येईल. या खात्यामधून सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या मुलास चार वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंतचे मोफत शिक्षण दिलं जाईल. (bank news army news bandhan bank start shaurya salary account for army personnel)

संबंधित बातम्या – 

Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर

फक्त रोज 20 रुपये करा बचत आणि मिळवा 2 लाख 65 हजार, सगळ्या बेस्ट आहे योजना

(bank news army news bandhan bank start shaurya salary account for army personnel)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.