Bank Strike : पुढचे दोन दिवस बँक बंद राहणार, SBI सह देशातील अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांचा संप
सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे (Bank strike on 15 and 16 march to oppose bank mergers).
मुंबई : सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. हा संप उद्या आणि परवा म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी असणार आहे. या संपाचा बँकिंग सुविधांवर मोठा परिणाम होऊ शकतो. संपामुळे चेक क्लीअरन्स किंवा लोन मंजुरी सारख्या सुविधांना अडचण येऊ शकते (Bank strike on 15 and 16 march to oppose bank mergers).
10 लाख कर्मचारी संपावर जातील
युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने याबाबत माहिती दिली आहे. या यूनियनमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटना सहभागी आहेत. दोन दिवसीय संपात देशभरातील जवळपास 10 लाख कर्मचारी संपावर जातील, असा दावा युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने केला आहे (Bank strike on 15 and 16 march to oppose bank mergers).
बँकांकडून संपाबाबत ग्राहकांना पूर्वकल्पना
दरम्यान, स्टेट बँकेसह इतर बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत आधीच माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा जर संप होईळ तर त्याचा बँकेच्या कामकाजांवर परिणाम होईल. बँकेच्या प्रत्येक शाखेतील कामकाजावर त्याचा प्रभाव पडेल, असं ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आलं आहे. तसेच कामकाज सुरळीत चालावे यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन बँकांकडून देण्यात आलंय.
दोन बँकांचं विलगीकरण होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं तेव्हा देशातील दोन बँकांचं खासगीकरण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. देशात सध्या 12 सरकारी बँक आहेत. यापैकी दोन बँकांचं खासगीकरण केलं तर देशात फक्त दहा बँक सरकारी राहतील. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात 14 सार्वजनिक बँकांचं विलनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, सत्ताधारी भाजपचे तब्बल 27 हून अधिक नगरसेवक सहलीवर!