अवघ्या 2.60 लाखात मारुतीची शानदार कार खरेदीची संधी, कंपनीकडून डिस्काऊंट जाहीर

वाहन कंपन्या विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक सवलती देत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रिय कार अल्टोवर भारी सवलतीची घोषणा केली आहे.

अवघ्या 2.60 लाखात मारुतीची शानदार कार खरेदीची संधी, कंपनीकडून डिस्काऊंट जाहीर
Maruti alto 800
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 8:17 PM

मुंबई : कोरोनामुळे ऑटोसह अनेक सेक्टर्सची अवस्था बिकट आहे. एकीकडे अनेक मोठ्या ऑटो कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे, दुसरीकडे कंपन्या विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक सवलती देत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रिय कार अल्टोवर भारी सवलतीची घोषणा केली आहे. दिल्लीत मारुती सुझुकी अल्टोची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. परंतु ही कार तुम्हाला केवळ 2.60 लाखांमध्ये मिळू शकते. परंतु ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत मर्यादित आहे. (Maruti Suzuki Offering Up to 40000 Discount on Alto)

मारुती ग्राहकांना जून महिन्यात वाहन खरेदीवर 20,000 रुपयांची रोख सूट आणि 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे, जर तुम्ही कॉर्पोरेट अंतर्गत बुकिंग केले तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. याद्वारे तुम्ही 3900 रुपये वाचवू शकता.

ऑफर 30 जूनपर्यंत

जर तुम्हाला मारुतीची ही आलिशान कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे फक्त 30 जूनपर्यंत वेळ असेल. कंपनीने 30 जूनपर्यंत ही ऑफर ठेवली आहे. त्याच वेळी, ही ऑफर वेगवेगळे डीलर्स आणि वेगवेगळ्या व्हेरिएंट्सवर देखील अवलंबून असेल. याशिवाय या ऑफरअंतर्गत तुम्ही कारचं बुकिंग केल्यास तुम्हाला बुकिंग बोनसचा लाभही मिळू शकेल.

कशी आहे मारुती अल्टो?

या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत या कारची एक्स शो रूम किंमत 2,99,800 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर या कारच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 4,48,200 रुपये इतकी आहे. या कारच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला BS6 कम्प्लायंट 796 सीसी, 3 सिलेंडर, 12 व्हॉल्व्ह इंजिन मिळते. हे इंजिन 6000rpm वर 48PS मॅक्सिमम पॉवर आणि 3500rpm वर 69Nm चा टॉर्क देतं. ऑल्टोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(Maruti Suzuki Offering Up to 40000 Discount on Alto)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.