मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकेचे चेकबुक निरुपयोगी होणार, पटापट करा हे काम
जर कोणी 1 ऑक्टोबरनंतर जुने चेकबुक वापरत असेल तर पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत. 1 एप्रिल 2020 ला अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झालीय.
नवी दिल्लीः जर तुमचे बँक खाते पूर्वी अलाहाबाद बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर अलाहाबाद बँकेचा MICR कोड आणि चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होणार आहे. इंडियन बँकेने ट्विट करून ही माहिती दिलीय. जर कोणी 1 ऑक्टोबरनंतर जुने चेकबुक वापरत असेल तर पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत. 1 एप्रिल 2020 ला अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झालीय.
तुमच्या जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक घ्या
कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत बँकिंग व्यवहाराचा आनंद घ्या, असे इंडियन बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय. अलीकडील अलाहाबाद बँकेचे एमआयसीआर कोड आणि चेक बुक 01.10.2021 पासून बंद होतील. तुमच्या जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक घ्या किंवा इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंगद्वारे अर्ज करा.
MICR कोड म्हणजे काय?
MICR कोड म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. जसे आपण त्याच्या नावावरून समजू शकता. MICR कोड चेकवर चुंबकीय शाईने छापला जातो. व्यवहाराचे संरक्षण करण्यासाठी हे मुख्यतः सुरक्षा बारकोड म्हणून वापरले जाते.
Enjoy smooth banking transactions without any glitch. The MICR code and cheque books of the erstwhile Allahabad Bank will be discontinued from 01.10.2021. Get new cheque books from your nearest branch or apply through internet banking/mobile banking.#IndianBank pic.twitter.com/xF1Rctppx2
— Indian Bank (@MyIndianBank) July 31, 2021
नवीन IFSC कोड जारी
अलाहाबाद बँकेचा IFSC कोड 1 जुलै 2021 पासून बदललाय, ग्राहकांना व्यवहार सुरू ठेवण्यासाठी नवीन IFSC कोड अपडेट करावा लागेल. तुम्ही तुमच्या घरच्या शाखेत जाऊन नवीन IFSC कोड मागू शकता किंवा www.indianbank.in/amalgamation या लिंकवर जाऊन तुम्ही कोड तपासू शकता.
जून तिमाही नफ्यात 220 टक्क्यांनी वाढ
सरकारी बँक इंडियन बँकेने जून तिमाहीत प्रचंड नफा कमावला. बँकेचा नफा 220 टक्क्यांनी वाढून 1,182 कोटी झाला. वर्षभरापूर्वी 2019-20 च्या याच तिमाहीत बँकेला 369 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 11,500.20 कोटी रुपये झाले, जे एक वर्षापूर्वी 2019-20 च्या तिमाहीत 11,446.71 कोटी रुपये होते.
संबंधित बातम्या
ICICI Bank ने आजपासून ATM मधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवले, ग्राहकांवर काय परिणाम?
पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दरमहा 3300 रुपये मिळवा, जाणून घ्या सर्वकाही
Big news! From 1 October 2021, the check book of Allahabad Bank will be useless