BSE NSE Big Update : बीएसई-एनएसई लवकरच होणार इतिहासजमा? गुजरातला हलवणार, काय आहे प्लॅन

BSE NSE Big Update : बीएसई-एनएसई हा लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. नवीन समीकरणे आकाराला येऊ घातली आहे. जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात येत आहे. जगातील शेअर बाजारांशी स्पर्धा करण्यासाठी आता नवीन प्लॅन आखण्यात येत आहे. काय आहे ही योजना..

BSE NSE Big Update : बीएसई-एनएसई लवकरच होणार इतिहासजमा? गुजरातला हलवणार, काय आहे प्लॅन
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:33 AM

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : भारताच्या शेअर बाजाराची पायाभरणी Bombay Stock Exchange ने झाली आहे. जगातील 5 वे सर्वात मोठे भारतीय शेअर मार्केट आहे. देशातील शेअर बाजाराची ओळख अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) होते. बीएसई केवळ भारताचा नाही तर आशियाचा पण जुना स्टॉक एक्सचेंज आहे. मुंबई शएअर बाजाराची सुरुवात 148 वर्षांपूर्वी म्हणजे 9 जुलै 1875 रोजी झाली होती. त्यानंतर 1990 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) हा भारताचा प्रमुख स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आला. पण आता बीएसई आणि एनएसई लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. नवीन समीकरणे आकाराला येत आहे. जगातील शक्तीशाली शेअर बाजाराशी (Share Market) स्पर्धा करण्यासाठी नवीन योजना आखण्यात येत आहे. काय आहे हा प्लॅन?

गुजरातशी काय आहे कनेक्शन

गुजरातमधील गांधीनगरमध्ये जागतिक आर्थिक घडामोडींसाठी एक खास शहर उदयास आले आहे. गुजरात सरकार आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून हा Gift City म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीची उभारणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवांचे हे एक केंद्र आहे. माहिती तंत्रज्ञान, एआय आधारीत तंत्रज्ञानाची मदत, आर्थिक क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे विशेष उपक्रम सुरु आहेत. आता तुम्ही म्हणाल याचा आणि बीएसई-एनएसईचा काय संबंध आहे. तर संबंध येणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

हे सुद्धा वाचा

हा आहे प्लॅन

गुजरातमधील इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिस सेंटरचा(IFSC) आता थेट बीएसई-एनएसईशी संबंध येणार आहे. एका वृत्तानुसार, NSE-BSE यांचे या IFSC मध्ये विलिनीकरण करण्यात येऊ शकते. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) याच सप्टेंबर महिन्यात याविषयीचा अर्ज करण्यात येऊ शकतो. अर्थात यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांना त्यांच्या संचालक मंडळाची या विलिनीकरणासाठी मंजूरी घ्यावी लागेल. त्यांनतर पुढील प्रक्रिया पार पडतील. अर्थात अजून या प्रक्रियेशी संबंधित अधिकृत माहिती समोर आली नाही.

ही कसरत कशासाठी

भारतीय शेअर बाजार एकसंघ पणे परदेशी बाजारांशी चांगली स्पर्धा करु शकेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो. त्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. तो यापुढे झेप घेऊ शकतो. त्यासाठी एकसंघपणा आवश्यक आहे. त्यामुळेचे दोन्ही स्टॉकचे विलिनीकरण करुन आशियाच नाही तर जगातील टॉप 3 शेअर बाजार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांना हे एक मोठे पाऊल असल्याचे वाटते. त्यामुळे एक देश, एक स्टॉक एक्सचेंज हे सूत्र गुंफण्यात येत आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.