नेपाळाचे अब्जाधीश, भारतातील प्रत्येक किराणा दुकानांमध्ये प्रॉडक्ट, कोण आहे…

binod chaudhary business: बिनोद चौधरी यांची आवड अकाऊंटमध्ये होती. त्यामुळे ते भारतात येऊन सीए करणार होते. परंतु त्याचवेळी त्यांच्या वडिलांची प्रकृती खराब झाली. त्यानंतर जबाबदारीने त्यांना व्यवसायात आणले. परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

नेपाळाचे अब्जाधीश, भारतातील प्रत्येक किराणा दुकानांमध्ये प्रॉडक्ट, कोण आहे...
Binod Chaudhary
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 4:18 PM

Binod Chaudhary net worth : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहे. 247 बिलियन डॉलर संपत्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आहे. फोर्ब्सनुसार त्यांची संपत्ती 107.1 बिलियन डॉलर आहे. देशातील आणखी एक बडे उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे 78 बिलियन डॉलर संपत्ती आहे. भारताच्या शेजारील देश नेपाळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिनोद चौधरी आहे. त्यांची संपत्ती 1.8 बिलियन डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत ते अमेरिकेतील एकमात्र व्यक्ती आहे. कोण आहे बिनोद चौधरी? त्यांनी इतका पैसा कसा कमवला?

बिनोद चौधरी यांचा व्यवसाय काय?

फोर्ब्सनुसार, बिनोद चौधरी नेपाळमधील एकमेव अब्जाधीश असलेले श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची ओळख प्रसिद्ध इंस्टेंट नूडल ब्रँड वाई वाईचे (Wai-Wai) संस्थापक म्हणून झाली आहे. वाई वाईने भारतातील मॅगी सारख्या बँडला जोरदार टक्कर दिली आहे. त्यांची संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा (1.8 बिलियन डॉलर) जास्त आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेत बिनोद चौधरी यांचे योगदान मोठे आहे.

JRD टाटांकडून घेतली प्रेरणा

बिनोद चौधरी यांचा जन्म काठमांडूमध्ये एका व्यापारी परिवारात झाला. त्यामुळे लहानपणापासून त्यांचा कल व्यवसाय आणि उद्योगाकडे होता. तसेच त्यांनी जे.आर.डी.टाटा आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान व्यक्तींकडूनही प्रेरणा घेतली. परिश्रम आणि योग्य विचाराने प्रत्येक स्वप्न साकार होऊ शकते हे चौधरी यांच्या यशोगाथेतून दिसून येते.

हे सुद्धा वाचा

अशी केली उद्योगाला सुरुवात

बिनोद चौधरी थायलंड गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी इंस्टेंट नूडल्स पाहिले. त्यातून प्रेरणा घेऊन नेपाळमध्ये त्यांनी वाई वाई नूडल्स सुरु केले. आता तो ब्रँड नेपाळच नव्हे तर भारतासह इतर देशांमध्येही लोकप्रिय झाला आहे. वाई वाईने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची चव, कुकिंग स्टाईल लोकप्रिय आहे. त्यांनी आपली ओळख त्या ब्रँडपर्यंतच मर्यादीत ठेवली नाही. त्यांनी नॅशनलने पॅनासोनिकसोबत भागीदारी केली आणि नेपाळच्या बाजारपेठेत सुझुकी कार आणण्याचाही प्रयत्न केला. चौधरी यांचे व्यावसायिक मन नेहमीच नवीन संधी शोधत असते. त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात यश मिळाले.

बिनोद चौधरी यांची आवड अकाऊंटमध्ये होती. त्यामुळे ते भारतात येऊन सीए करणार होते. परंतु त्याचवेळी त्यांच्या वडिलांची प्रकृती खराब झाली. त्यानंतर जबाबदारीने त्यांना व्यवसायात आणले. परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.