Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

आता तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडर खूप स्वस्त किमतीत मिळणार आहे. होय, जर तुम्ही पेटीएमद्वारे एलपीजी सिलिंडर बुक केला तर तुम्हाला 2,700 रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे.

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?
LPG Gas Cylinder
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 10:28 AM

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या किमती सतत वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांच्या घरांचे बजेट कोलमडले आहे. या दरम्यान आता तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडर खूप स्वस्त किमतीत मिळणार आहे. होय, जर तुम्ही पेटीएमद्वारे एलपीजी सिलिंडर बुक केला तर तुम्हाला 2,700 रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी आकर्षक कॅशबॅक

खरं तर भारतातील अग्रगण्य डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने बुधवारी एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी आकर्षक कॅशबॅक आणि इतर बक्षिसांची घोषणा केली. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, नवीन वापरकर्ते ‘3 पे 2700 कॅशबॅक ऑफर (3 Pay 2700 Cashback Offer) चा लाभ घेऊ शकतील, ज्यामध्ये त्यांना तीनच्या पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत खात्रीशीर कॅशबॅक मिळेल. तेसुद्धा सलग महिने मिळणार आहे.

नेमकी ऑफर काय?

पेटीएमच्या मते, विद्यमान वापरकर्त्यांना प्रत्येक बुकिंगवर बक्षिसे आणि 5,000 कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आश्चर्यकारक सौद्यांसाठी आणि शीर्ष ब्रँडच्या गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात. पेटीएमने अलीकडेच नवीन फीचर्स जोडून सिलिंडर बुकिंगचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वापरकर्त्यांना सिलिंडरच्या डिलिव्हरीचा मागोवा घेण्याचा पर्याय देखील आहे. यासोबत फोनवर सिलिंडर भरण्यासाठी एक रिमाइंडर देखील येईल.

बुकिंग कसे करावे?

>>सर्वप्रथम पेटीएम अॅप डाऊनलोड करा >>त्यानंतर सिलिंडर बुकिंगला जा. मग तुमची गॅस एजन्सी निवडा. यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय दिसतील. >>यानंतर तुमचा नोंदणीकृत क्रमांक किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाका. >>ही माहिती भरल्यानंतर तुम्ही प्रोसिड बटण दाबून पेमेंट करू शकता.

तीन महिन्यांपर्यंत कॅशबॅक

एलपीजी सिलिंडरची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा कॅशबॅक पहिल्यांदा उपलब्ध होईल. दरमहा तीन गॅस सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक तीन महिन्यांसाठी उपलब्ध असेल.

संबंधित बातम्या

FD वर 5 वर्षांत 65 हजारांची कमाई, आपल्या ग्राहकांना ‘या’ बँकेची खास ऑफर

SBI Gold Loanवर विशेष सवलत, जाणून घ्या फायदा कसा घ्याल आणि अंतिम मुदत कोणती?

Book a gas cylinder from Paytm and get Rs 2700 cashback, how many days offer?

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...