BPCL-हमसफरकडून दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, घसबसल्या मागवा डिझेल

त्याअंतर्गत बीपीसीएल 20 लिटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल देण्यात येणार आहे. 20 लिटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांना डोअरस्टेप वितरण सुविधा उपलब्ध आहे.

BPCL-हमसफरकडून दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, घसबसल्या मागवा डिझेल
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:59 PM

नवी दिल्लीः राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने डिझेलच्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी स्टार्टअप हमसफर इंडियाशी हातमिळवणी केलीय. त्याअंतर्गत बीपीसीएल 20 लिटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल देण्यात येणार आहे. 20 लिटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांना डोअरस्टेप वितरण सुविधा उपलब्ध आहे.

नवीन प्रयत्नांचा फायदा लहान गरजा असलेल्या ग्राहकांना होणार

सफारी 20 नावाच्या जेरीकनमधील डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरीचा फायदा लघु उद्योग, मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम साइट्स, शेतकरी, मोबाईल टॉवर्स, शिक्षण संस्था तसेच लहान उद्योगांना होईल. नवीन प्रयत्नांचा फायदा लहान गरजा असलेल्या ग्राहकांना होणार आहे.

या राज्यांमध्येही ही सुविधा सुरू केली जाणार

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 लीटरची जेरीकान सेवा सुरू करण्याची बीपीसीएलचीही योजना आहे, कारण बहुतेक रिसॉर्ट हॉटेल, उद्योग आणि शेतात दुर्गम भागात आहेत आणि मोटारसायकलवर उपलब्ध करून देण्यात येणारी ही सेवा या राज्यातील पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

डोअरस्टेप डिझेल वितरणामुळे अशा अनेक समस्या सोडवल्या जातील

यापूर्वी डिझेलच्या ग्राहकांना किरकोळ दुकानातून बॅरेलमध्ये खरेदी करायची होती. कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचा अभाव होता. डोअरस्टेप डिझेल वितरणामुळे अशा अनेक समस्या सोडवल्या जातील आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांना कायदेशीररित्या डिझेल उपलब्ध होईल.

खासगीकरण व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले

चालू आर्थिक वर्षात सरकारने खासगीकरण व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया उशीर होत आहे. यावर्षी निर्गुंतवणुकीत बीपीसीएलचे नाव अव्वल आहे. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची तेल रिफायनरी कंपनी आहे, ज्यामध्ये सरकारची सध्याची हिस्सेदारी 52.98 टक्के आहे आणि सरकार त्यात आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे.

100 टक्क्यांपर्यंत एफडीआय वाढवण्याचा विचार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य व उद्योग मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील एफडीआय धोरणात नवीन कलम समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. या कलमाअंतर्गत तेल आणि गॅस पीएसयूचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास स्वयंचलित मार्गाने 100% एफडीआय परवानगी दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

NPS मध्ये गुंतवणूक करणे सोपे, घर बसल्या उघडा खाते, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

TDS परताव्यावरही व्याज उपलब्ध, आयकराचा दावा कसा करू शकता, जाणून घ्या

BPCL-Humsafar launches doorstep delivery of diesel in Delhi

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.