ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण

नियामकाने म्हटले आहे की, फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती प्रदान केलेली नाही. यासंदर्भात त्याला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता. रिपोर्टनुसार, फेसबुक त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी करीत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते.

ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण
Facebook
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 8:51 PM

नवी दिल्ली : ब्रिटनने सोशल मीडिया वेबसाईट फेसबुकवर मोठा दंड (Penalty on Facebook)ठोठावलाय. माहिती भंग केल्याच्या प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg)फेसबुकला हा दंड ठोठावल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक (5 कोटी डॉलरपेक्षा जास्त) दंड ठोठावला.

फेसबुकने जाणीवपूर्वक उल्लंघन केले: सीएमए

GIF प्लॅटफॉर्म Giphy खरेदी केल्यानंतर तपासादरम्यान नियामक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड लावण्यात आलाय. स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाने (सीएमए) म्हटले आहे की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे तो दंड लावणे आवश्यक झाले. सीएमएने म्हटले की, कोणतीही कंपनी कायद्याच्या वर असू शकत नाही. नियामक म्हणतो की, फेसबुक जिफीच्या अधिग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरले. याखेरीज फेसबुकदेखील तपासादरम्यान जिफीला त्याच्या प्लॅटफॉर्मसह ऑपरेट करण्यात अपयशी ठरलेत.

नियामकाने फेसबुकला वारंवार इशारा दिला होता

नियामकाने म्हटले आहे की, फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती प्रदान केलेली नाही. यासंदर्भात त्याला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता. रिपोर्टनुसार, फेसबुक त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी करीत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. फेसबुक अॅप व्यतिरिक्त कंपनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसाठी नवीन नावे देखील जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Facebook चं नाव बदलणार

सोशल मीडिया कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc) पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे. The Verge मधील एका रिपोर्टनुसार, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यावर चर्चा करू शकतात. तथापि, अहवालात असे म्हटले गेले आहे की रिब्रँडिंगबद्दलच्या बातम्या यापेक्षा लवकर येऊ शकतात. फेसबुकच्या मूळ अॅप आणि सेवेच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. हे एका मूळ कंपनीच्या अंतर्गत ठेवण्यात येईल ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये लाखो युजर्ससह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या इतर ब्रँडचा समावेश असेल.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.