Budget 2024 | मोदी सरकारचा बजेटमध्ये मास्टर स्ट्रोक, महिलांसाठी ही योजना लवकरच भारतभर

Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अंतरिम बजेट सादर करतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या बजेटमध्ये अनेक धमाके पाहायला मिळू शकतात. महिला आणि तरुणांसाठी खास योजना आणि सवलतींचा पाऊस पडू शकतो. मोदी कार्यकाळातील 2.0 चे अखेरचे बजेट खास असेल.

Budget 2024 | मोदी सरकारचा बजेटमध्ये मास्टर स्ट्रोक, महिलांसाठी ही योजना लवकरच भारतभर
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 5:59 PM

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अंतरिम बजेट सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतरिम बजेट आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे अंतरिम बजेट आहे. त्यामुळे लोकसभेत जोरदार कमबॅकसाठी मोदी सरकार मैदानात उतरणार आहे. तज्ज्ञांच्या मते अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार अनेक मोठ्या घोषणा करु शकते. मोदी कार्यकाळाच्या 2.0 या बजेटमध्ये प्रत्येक वर्गाला मोठी अपेक्षा आहे. खासकरुन शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी हा अर्थसंकल्प खास असेल.

महिलांसाठी काय असेल खास ?

मीडिया रिपोर्टसनुसार, लोकसभा निवडणुकीत महिला वोट बँक खेचण्यासाठी मोदी सरकार लाडली बहना, लाडकी बहिण ही योजना संपूर्ण देशभरात लागू करु शकते. वृत्तानुसार, त्यासाठी पात्रता, निकष, वार्षिक उत्पन्न, त्याचा फायदा याची चर्चा सुरु झालेली आहे. ही योजना देशातील महिलांसाठी खास असेल. मध्य प्रदेशातील निवडणुकीत या योजनेने मोठी भूमिका अदा केली आहे. लाडली बहना योजने भाजपला मोठी लीड घेऊन दिली.

हे सुद्धा वाचा

महिलांसाठी मोठ्या निधीची तरतूद

तज्ज्ञांच्या मते, यावेळी महिलांसाठी या बजेटमध्ये मोठ्या निधीची तरतूद करण्यात येऊ शकते. अंतरिम बजेटमध्ये सरकार महिलांना थेट खात्यात रक्कम जमा करणे, कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळू शकतो. महिला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. मनरेगात महिलांना विशेष आरक्षण देऊन, त्यांचे मानधन वाढविण्यात येऊ शकते.

शेतीचे अर्थचक्र बदलणार

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यावेळी बजेटमध्ये केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच्या बजेटपेक्षा यंदा जास्त आर्थिक तरतूद करण्यात येईल. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 21,933 कोटी रुपये देण्यात आले होते. सध्याच्या आर्थिक वर्षात ही तरतूद 1,25,036 कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. लवकरच या निधीत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी, पीएम फसल बीमा यासारख्या योजनांमध्ये आर्थिक अनुदान वाढीच्या तयारीत आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.