आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाई; कर्ज घटलं, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ

स्टील जगतातील आघाडीची कंपनी मानली जाते. जानेवारी ते डिसेंबर हे कार्यवाहीसाठी आर्थिक वर्ष (Base Year) म्हणून गणले जाते. समान कालावधीत गेल्या आर्थिक तिमाहित कंपनीचं निव्वळ उत्पन्न $2,285 मिलियन होते.

आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाई; कर्ज घटलं, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ
आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाईImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:59 PM

नवी दिल्ली : उद्योग जगतातील आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही अहवाल समोर येत आहे. जागतिक स्टील क्षेत्रातील(Steel Production) अग्रणी मानल्या जाणाऱ्या आर्सेलरमित्तलनं तिमाही अहवाल नुकताच जारी केला आहे. मित्तल स्टीलच्या गंगाजळीत बक्कळ कमाईची भर पडली आहे. पहिल्या आर्थिक तिमाहीत कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात 80.52 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली असून उत्पन्नात $4,125 मिलियन (अंदाजित 31,350 कोटी रुपये) डॉलरची भर पडली आहे. स्टील जगतातील आघाडीची कंपनी मानली जाते. जानेवारी ते डिसेंबर हे कार्यवाहीसाठी आर्थिक वर्ष (Base Year) म्हणून गणले जाते. समान कालावधीत गेल्या आर्थिक तिमाहित कंपनीचं निव्वळ उत्पन्न $2,285 मिलियन होते. जागतिक स्तरावरील आर्सेलर मित्तल (Arcelor Mittal) ही स्टील व खाण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते. कंपनी आपल्या आर्थिक कामकाजासाठी जानेवारी-डिसेंबर वर्ष प्रमाण मानते. (Buisness update in Marathi Arcelor Mittal reports first quarter 2022 results)

कर्जात घट, नफ्यात वाढ

कंपनीच्या कर्जात देखील घट झाल्याचे कंपनीने प्रकाशित केलेल्या स्टेटमेंटवरुन दिसून आलं आहे. कंपनीच्या डोक्यावरील कर्जाचा भार $878 मिलियन वरुन $3.2 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या स्टेटमेंटनुसार, समान आर्थिक तिमाहीत क्रूड स्टीलचे उत्पादन 16.3 मिलियन टनावरुन 17.6 मिलियन टनावर पोहोचले आहे.

संकट काळात परीक्षा

पहिल्या आर्थिक तिमाहित रशिया-युक्रेन विवादाचा मोठा फटका बसला. त्यामुळे संकटकाळात सहकार्यात्मक भागीदारी करणाऱ्या घटकांना सहाय्य पुरविणे आमचं कर्तव्य असल्याचं आदित्य मित्तल यांनी म्हटलं आहे. कंपनीने 26000 कंपनीच्या घटकांना मदतीचा हात पुढे केला. रशिया व युक्रेन वादासोबतच वाढत्या महागाईचा देखील फटका बसला. विपरित आर्थिक व सामाजिक संकट काळात कंपनीनं कारभाराचं स्थिर धोरण स्विकारलं. कंपनीचे बिझनेस मॉडेल, प्रॉडक्ट कॅटेगरी यांची मोठी परीक्षा होती, असे मित्तल यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

बलाढ्य पोलाद कंपनी

आर्सेलर मित्तल ही बहुराष्ट्रीय स्टील उत्पादक कंपनी मानली जाते. कंपनीचे मुख्यालय लक्झेंबर्ग शहरात आहे. आर्सेलर मित्तल ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी मानली जाते. जगभरातील 60 देशांत विस्तार पावलेल्या आणि 2 लाख कर्मचारी असलेल्या आर्सेलर मित्तलचा जगातील एकूण स्टील उत्पादनांत 10 टक्के वाटा आहे. (Buisness update in Marathi Arcelor Mittal reports first quarter 2022 results)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.