Business Ideas For Villages : कमी गुंतवणूकीत मोठा नफा, गावासह शहरातही सुरु करता येतील ‘हे’ पाच व्यवसाय

तुम्ही लहान शहरं किंवा खेडापाड्यात कमाई करण्यासाठीचे (5 business ideas for villages) काही पर्याय उपलब्ध करुन देणार आहोत.

Business Ideas For Villages : कमी गुंतवणूकीत मोठा नफा, गावासह शहरातही सुरु करता येतील 'हे' पाच व्यवसाय
महिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 3:40 PM

Business Ideas For Villages मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर बऱ्याच लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अनेकजण त्यांची आर्थिक स्थिती सुधरावी यासाठी विविध पर्याय शोधत आहे. अशा परिस्थिती तुम्ही लहान शहरं किंवा खेडापाड्यात कमाई करण्यासाठीचे (5 business ideas for villages) काही पर्याय उपलब्ध करुन देणार आहोत. यामुळे तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारु शकते. (Business Ideas For Small Towns And Villages In India To Earn Money during corona)

1. किराणा सामानाचे दुकान

कोणत्याही छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये सहज सुरु करता येईल असा व्यवसाय म्हणजे किराणा सामनाचे दुकान. यामुळे तुम्हाला सहजतेने पैसे मिळू शकतात. कोरोना काळात बरेच लोक मॉल किंवा मोठ्यामोठ्या दुकानात जाऊन सामान घेण्याऐवजी जवळच्या ग्रॉसरी स्टोअरमधून सामान ऑर्डर करतात. तसेच या काळात किराणा सामानाची मागणीही वाढत आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्ही चांगली सेवा आणि चांगले उत्पादन दिले तर तुमची निश्चित कमाई करु सकता. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या दुकानात दूध, अंडी, ब्रेड, फळे आणि भाज्या देखील ठेवा. ज्यामुळे तुमच्या कमाईत वाढ होईल.

2. फुलांची शेती

जर तुम्ही गावचे रहिवाशी असाल तर तुम्ही फुलांची लागवड करुन भरपूर नफा कमवू शकता. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये फुलझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे त्यांना मोठा नफाही मिळतो. मात्र फुलांना चांगली किंमत मिळण्यासाठी त्यांना ते शहरातील मुख्य बाजारात नेऊन विकावं लागू शकते. तसेच जर तुम्हाला एखाद्या व्यवसायकडून ठेका मिळत असेल तर आर्थिक गणित समजून घ्या.

3. पॉल्ट्री फार्म/ मत्स्यपालन

पोल्ट्री फार्म आणि मत्स्यपालन व्यवसायात चांगले उत्पन्न मिळते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोंबडीद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरली होती. मात्र त्यानंतर सरकारने हे चुकीचे असल्याचे सांगितले होते. पोल्ट्री फार्म आणि मत्स्यपालन हा व्यवसाय तुम्हाला अल्पावधीतच चांगला परतावा मिळून देऊ शकतो. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते.

4. ट्यूशन क्लास

कोरोनामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. मात्र मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवला जात आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही घरबसल्या Online Classes सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला काहीही खर्च येत नाही. तसेच तुमच्या आजूबाजूला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे तुम्ही प्रत्यक्ष ट्यूशनही घेऊ शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.

5. कपड्यांचे दुकान

देशात सर्वाधिक कमाई देणाऱ्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणजे कपड्यांचा. लोक खाण्यापिण्याप्रमाणेच कपड्यांवरही खूप खर्च करतात. याच गोष्टींचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात कपड्यांचे दुकान सुरु करु शकतात. यात तुम्ही विविध डिझाईन, पॅटर्नचे कपडे विक्रीसाठी आणू शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला बक्कळ पैसा मिळतो. मात्र यासाठी तुम्हाला नवीन कपड्यांची देखरेखही ठेवावी लागते. (Business Ideas For Small Towns And Villages In India To Earn Money during corona)

संबंधित बातम्या : 

कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार, केंद्र सरकार अनेक भत्ते कापणार

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? व्याजदर किती, जाणून घ्या

केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, LIC ची ‘ही’ पॉलिसी तुमच्या मुलाला लखपती बनवणार

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.