Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amul Franchisee Registraion : Amul ची फ्रँचायझी घ्या आणि लाखो कमवा, 2 लाखांवर थेट 10 लाखांचा फायदा

डेअरी प्रोडक्टमधील प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत (Amul Franchise) व्यवसाय करण्याची संधी देत आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करून महिन्याला नियमित कमाई होऊ शकते.

Amul Franchisee Registraion : Amul ची फ्रँचायझी घ्या आणि लाखो कमवा, 2 लाखांवर थेट 10 लाखांचा फायदा
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 7:46 AM

मुंबई : तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासमोर चांगला बातमी आहे. तुम्ही दुधाचा व्यवसाय करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. डेअरी प्रोडक्टमधील प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत (Amul Franchise) व्यवसाय करण्याची संधी देत आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करून महिन्याला नियमित कमाई होऊ शकते. (business ideas Take the Amul franchise and earn millions, a direct profit of Rs 10 lakh on Rs 2 lakh)

? नफ्याची कोणतीही चिंता नाही

अमूल कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी ऑफर करीत आहे. इतकंच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही खूपच कमी आहे. तुम्ही केवळ 2 लाखांपासून ते 6 लाखांपर्यंत खर्च करून, तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीलाच तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

? नेमकी गुंतवणूक कशी करावी?

अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत आहे. जर तुम्ही अमूल आऊटलेट (Amul Outlet), अमूल रेल्वे पार्लर ( Amul Railway Parlor) किंवा अमूल किओस्कची (Amul Kiosk) फ्रँचायझी घेणार असाल, तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 हजार रुपये (म्हणजे परत न मिळण्याच्या अटीवर), तर रिनोव्हेशन अर्थात नूतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी 75 हजार रुपयांचा खर्च येईल. याबाबतची अधिक माहिती तुम्हाला फ्रँचायझी पेजवर मिळू शकेल.

?दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये किती गुंतवणूक आवश्यक?

जर तुम्हाला अमूल आईस्क्रीम पार्लर चालवायचं असेल, त्यासाठी तुम्हाला फ्रँचायजी हवी असेल तर त्यासाठी थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ब्रँड सिक्युरिटी 50 हजार, रिनोव्हेशन अर्थात नूतनीकरणासाठी 4 लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी 1 लाख 50 हजार रुपये खर्च येईल.

?फ्रँचायजीमध्ये किती कमाई होणार?

अमूलच्या मते, फ्रँचायजीद्वारे दर महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र कोणत्याही व्यवसायासाठी जागा/ ठिकाण महत्त्वाचं असतं. अमूलचं आऊटलेट सुरू केल्यानंतर कंपनी अमूलच्या उत्पादनावर किमान विक्री किंमत अर्थात MRP वर कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दूध उत्पादनावर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळतं. आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रँचायझीवरही मोठं कमिशन दिलं जातं. आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन दिलं जातं. प्री पॅक्ड आईस्क्रीमवर 20 टक्के, अमूल प्रोडक्टवर 10 टक्के असं कमिशनचं गणित आहे.

?फ्रँचायझी घेण्यासाठी नियम-अटी काय?

जर तुम्हाला अमूल आऊटलेट फँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 150 स्क्वेअर फूट जागा हवी. जर इतकी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकते. आयस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी ही अट 300 स्क्वेअर फूट जागेची आहे. यापेक्षा कमी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकणार नाही.

?अमूलकडून कोणती मदत मिळेल?

अमूलकडून तुम्हाला कंपनीची ओळख दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडिगवर सबसिडी मिळेल. त्याशिवाय सुरुवात करण्यासाठी विशेष मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जातील. याशिवाय मालक किंवा कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिलं जाईल. तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठी शहरं, जिल्ह्याच्या ठिकाणांवर होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हे डीलर्स तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवतील.

? फ्रँचायझीसाठी अर्ज कुठे करायचा?

जर तुम्हाला अमूलची फ्रँचायझी हवी असेल retail@amul.coop यावर मेल करावा लागेल.

सर्व तपशील डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्या. http://amul.com/m/amul-scooping-parlours

टीप – वरील माहिती ही अमूलच्या वेबसाईटवरील आहे. अपडेट तपशील जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्या.

संबंधित बातम्या

EPFO Rules: PF खातेदारांनो तात्काळ नॉमिनीचं नाव जोडा, अन्यथा 7 लाखांचं नुकसान होणार

Alert! HDFC बँकेच्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 28 तासांसाठी बंद, पटापट कामं उरका

business ideas Take the Amul franchise and earn millions, a direct profit of Rs 10 lakh on Rs 2 lakh

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.