या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात
एमसीएलआर संबंधी हा नवा नियम 11 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सरकारी क्षेत्रातील यूनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या लँडिंग रेट (MCLR) मध्ये 15 बेस पॉईंटने घट केली आहे. ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे 15 आणि 5 बेसिस पॉइंट्सने कमी केलं आहे. यामुळे आता ओव्हरनाईट एमसीएलआर 6.75 टक्क्यांच्या जागी 6.60 टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा एमसीएलआर 6.70 टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी 6.75 टक्के इतका होता. एमसीएलआर संबंधी हा नवा नियम 11 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (business news government bank union bank of india cuts mclr rate )
कार्यकाळ एमसीएलआर (%)
ओव्हरनाईट एमसीएलआर – 6.60%
– 1 महिन्याचा एमसीएलआर – 6.70%
– 3 महिन्याचा एमसीएलआर- 6.90%
– 6 महिन्याचा एमसीएलआर – 7.05%
– 1 महिन्याचा एमसीएलआर – 7.20%
FD च्या दरांमध्ये वाढ
याआधीही देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक SBI ने काही मोजक्याच मॅच्योरिटी पीरियडच्या मुदत ठेवींच्या (FD) दरांमध्ये वाढ केली होती. बँकने 1 ते 2 वर्षाहून कमी एफडीवर व्याज दरांमध्ये 10 टक्के पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांवर वाढवलं आहे.
एसबीआयचे सुधारित दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल एफडीवर 8 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत. खरंतर, एसबीआयने याआधीही 10 सप्टेंबर 2020 रोजी मुदत ठेवींवरील व्याज दरात सुधारणा केली होती.
अॅक्सिस बँकेचंही ग्राहकांना मोठं गिफ्ट
खासगी क्षेत्रातील बड्या अॅक्सिस बँकेने (Axis Bank) ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. कारण, आता मुदत ठेव (Fixed Deposit) अकाली बंद ठेवण्यासाठी बँके कोणताही दंड घेणार नाही. अॅक्सिस बँकेने आज 15 डिसेंबर 2020 रोजी आणि त्यानंतर बुक झालेल्या सर्व नवीन रिटेल मुदत ठेवी अकाली बंद केल्यास दंड घेतला जाणार नाही अशी घोषणा केली आहे. ही बातमी ग्राहकांच्या हिताची असून लिक्विडिटीच्या गरजेबद्दल कसलीही काळजी न करता ग्राहकांना जास्त काळासाठी बचत करण्यास आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन सुविधा सर्व नवीन मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींना (Recurring Deposits) लागू करण्यात येणार आहे. 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन ठेवींसाठी अकाली दंड आकारला जाणार नाही. इतकंच नाही तर बुकिंगनंतर 15 महिन्यांआधी संपूर्ण ठेव मागे घेतली तरीही दंड आकारला जाणार नाही. (business news government bank union bank of india cuts mclr rate )
संबंधित बातम्या –
सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख
अॅक्सिस बँकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, वेळेआधी FD बंद केली तर नाही लागणार दंड
(business news government bank union bank of india cuts mclr rate )