money
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेमध्ये (MIS) तुम्ही एकाच खात्यामधून 1000 ते साडेचार लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुमचं जॉईंट खातं असेल तर जास्तीत जास्त पैशांची मर्यादा 9 लाख रुपयांपर्यंत आहे.
म्हणजेच पती-पत्नी दोघेही एकत्र खात्यामध्ये 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये (POMIS) सध्या वार्षिक व्याज 6.5 टक्के आहे.
या योजनेत नाव नोंदण्यासाठी पीओएमआयएसचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला ओळखपत्र, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेची मुदत 5 वर्षे आहे. यामध्ये जर तुम्ही वेळेआधी पैसे काढले तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. यामध्ये एका वर्षात पैसे काढण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
काय आहेत या खात्याचे फायदे? - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एका पोस्ट ऑफिसमधून तुम्ही दुसर्या पोस्टवर योजना शिफ्ट करू शकता. 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला पुन्हा रक्कम गुंतवण्याची संधी मिळते. या खास योजनेमध्ये टीडीएस कपात केली जात नाही, पण व्याजावर कर भरावा लागतो.