सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेकडून अलर्ट, हा फोन आला तर उचलू नका नाहीतर खातं होईल रिकामं

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI ) त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्त्वाचं ट्वीट जारी केलं आहे. ट्वीटद्वारे बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा […]

सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेकडून अलर्ट, हा फोन आला तर उचलू नका नाहीतर खातं होईल रिकामं
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI ) त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्त्वाचं ट्वीट जारी केलं आहे. ट्वीटद्वारे बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा आणि तपासणी केल्याशिवाय आपली खासगी माहिती शेअर करू नका असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. नाहीतर तुम्हाला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. (business News sbi alert massage to his customer on fraud calls)

खरंतर, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्वत: ला एसबीआय अधिकारी असल्याचा दावा करत अनेक हॅकर्स ग्राहकांना फोन करतात आणि आपली माहिती घेऊन खातं रिकामं करतात. अशा असंख्य तक्रारीही बँकेकडे आल्या आहेत. त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली की हा कोणी बँकेचा माणून नसून फसवणूक करणारा आहे.

KYC व्हेरिफायच्या नावं येतो फोन

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही सायबर हॅकर्स बँक अधिकारी केवायसी व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करत आहेत. आपण त्यांना माहिती देताच खात्यातून पैसे काढले जात आहेत. अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं भासवून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करेन आणि तुमच्या खात्यामधून सगळे पैसे काढून घेईन. असं काहीही तुमच्यासोबत घडलं तर तात्काळ cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा. (business News sbi alert massage to his customer on fraud calls)

संबंधित बातम्या – 

तुमच्या PF वर व्याज मिळतंय की नाही? सोप्या पद्धतीने चेक करा

आता मातीशिवाय घरीच पिकवा भाज्या, कमी जागेत लाखोंनी कमावाल!

(business News sbi alert massage to his customer on fraud calls)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.