SBI कडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! 30 जूनपर्यंत ‘या’ धमाकेदार योजनेमध्ये करू शकता गुंतवणूक

ही योजना डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, जी पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आता ती तिसऱ्यांदा 30 जून 2021 करण्यात आली आहे.

SBI कडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! 30 जूनपर्यंत 'या' धमाकेदार योजनेमध्ये करू शकता गुंतवणूक
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 1:46 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेची मुदत (Special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे. मे महिन्यात, बँकेने एसबीआय विकेअर (SBI WECARE) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ही योजना डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, जी पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आता ती तिसऱ्यांदा 30 जून 2021 करण्यात आली आहे. (Business News sbi special fixed deposit scheme for senior citizens extended)

कोरोनो व्हायरस साथीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याज दरासाठी विशेष एफडी योजना सुरू केली गेली. बँकेने विशेष एफडी योजना तीन महिन्यांसाठी 30 जूनपर्यंत वाढवली आहे. विशेष एसबीआय विकेअर डिपॉझिट (SBI Wecare Deposit) योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते.

FD वर 0.80% अधिक व्याज

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 टक्के जादा व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 टक्के जादा व्याज देत आहे. अशा प्रकारे, एसबीआय विकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50+0.30) टक्के अधिक व्याज घेऊ शकतात.

योजनेची वैशिष्ट्ये

– 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

– ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.

– मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

– एसबीआय विकेअर ठेवीअंतर्गत नवीन एफडी खाते उघडणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोन्ही बाबींवर जास्त व्याजाचा लाभ मिळू शकेल.

– एसबीआयची ही योजना आता 30 जून 2021 पर्यंत खुली आहे.

जास्त मिळेल व्याज

एसबीआय सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.4 टक्के व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर एफडीला लागू असणारा व्याज दर 6.20 टक्के असेल. (Business News sbi special fixed deposit scheme for senior citizens extended)

संबंधित बातम्या – 

अडाणी ग्रीन एनर्जीने रचला इतिहास! पहिल्यांदाच 1 वर्षात 870 टक्के वाढले शेअर्स

Loan Moratorium वर कोर्टाचा मोठा निर्णय, सरकारच्या पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करण्यास थेट नकार

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या किंमती आणखी घसरल्या, आताच पाहा ताजे दर

(Business News sbi special fixed deposit scheme for senior citizens extended)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.