AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एनएसई’च्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला सीबीआयकडून अटक; चौकशीत धक्कादायक खुलाशांची शक्यता

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफीसर आणि माजी मॅनेजिंग डायरेक्टर चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना काल रात्री उशिरा सीबीआयने चेन्नईमधून अटक केली आहे.

'एनएसई'च्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला सीबीआयकडून अटक; चौकशीत धक्कादायक खुलाशांची शक्यता
आनंद सुब्रमण्यम याला अटक
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 12:48 PM
Share

चेन्नई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफीसर आणि माजी मॅनेजिंग डायरेक्टर चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना काल रात्री उशिरा सीबीआयने चेन्नईमधून अटक केली आहे. अटक करण्यात आल्यानंतर आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडे असलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांच्या चेन्नईमधील घरावर छापेमारी केली आहे. चित्रा रामकृष्ण यांची ज्या बाबाचा उल्लेख केला होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून आनंद सुब्रमण्यमच असावा असा संशय सीबीआयला आहे. आनंद सुब्रमण्याम यानेच चित्र रामकृष्ण यांच्याशी बाबा बनून संवाद साध्यल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

एक कोटी 68 लाखांचे पॅकेज

समोर आलेल्या माहितीनुसार नॅशनला स्टॉक एक्सचेंजमध्ये एक एप्रिल 2013 ला आनंद याच्या पत्नीला कंसल्टेंट पदावर संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना साठ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यानंतर आनंद यांची नियुक्ती चीफ स्ट्रॅटिजिक ऍडव्हायझर म्हणून करण्यात आली. त्यावेळी त्याला एक कोटी 68 लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्यापूर्वी तो 15 लाख रुपयांच्या पॅकेजवर एका कंपनीत तो नोकरी करत होता. पुढे हाच आनंद सुब्रमण्यम चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार बनला.

प्रकरण नेमकं काय आहे?

नॅशन स्टॉक एक्सचेंजच्या व्यवहारात अनियमिता आढळून आल्याने या प्रकरणात सेबीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान माजी मॅनेजिंग डायरेक्टर चित्रा रामकृष्ण यांनी अनेक खळबजनक खुलासे केले आहेत. हिमालयातील एक साधू आहे, ज्याच्या सल्ल्याने सर्व उलाढाल होते असा दावा रामकृष्ण यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आनंद याला अटक करण्यात आली आहे. आनंद हाच साधू बनून चित्रा रामकृष्ण यांच्याशी संवाद साधत असावा असा संशय सीबीआयला आहे.

संबंधित बातम्या

पुढच्या दोन वर्षांत लग्न करताय? रशिया-युक्रेन युद्धाचा तुम्हालाही फटका बसणार…

Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने

Russia Ukraine crisis : भारताला गव्हाची निर्यात वाढवण्याची संधी; देशात पुरेशा प्रमाणात साठा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.