7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलैपासून वाढीव वेतन! काय फायदा होणार?
केंद्र सरकारने 52 लाख कर्मचारी आणि 65 लाखपेक्षा अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी दिलीय. सरकार 1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार नव्या शिफारशीप्रमाणे महागाई भत्ता (DA) देणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 52 लाख कर्मचारी आणि 65 लाखपेक्षा अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी दिलीय. सरकार 1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार नव्या शिफारशीप्रमाणे महागाई भत्ता (DA) देणार आहे. मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर केंद्र सरकारने पुढील महिन्यापासून हा महागाई भत्ता देणार असल्याची माहिती संसदेत दिली. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे. आयोगाच्या शिफारसीप्रमाणे महागाई भत्ता (डीए) 11 टक्क्यांवरुन वाढून 28 टक्के होणार आहे (Central government going to implement 7th Pay Commission DA recommendation from 1 July 2021).
सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैपासून डीएत वाढ झाल्यास जानेवारी ते जून 2020 पर्यंतचा प्रलंबित डीएत 3 टक्क्यांची वाढ होईल. जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारी ते जून 2021 पर्यंत 4 टक्के अशी एकूण 11 टक्के वाढ होणार आहे.
वर्षाला 32 हजार रुपयांपेक्षा अधिकचा महागाई भत्ता मिळणार
सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याच्या वेतनात 3 प्रमुख गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. यात मूळ वेतन, भत्ता आणि कपातीचा भाग यांचा समावेश आहे. वेतन मॅट्रिक्सनुसार कर्मचाऱ्यांचं कमीतकमी मूळ वेतन 18,000 रुपये आहे. मूळ वेतनात वाढ झाल्यानं प्रति महिना 2,700 रुपयांची वाढ होणार आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना वर्षाला एकूण 32 हजार 400 रुपये महागाई भत्ता मिळेल.
एनवीएस कर्मचाऱ्यांना वाढीव मेडिकल क्लेम मिळणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासोबतच आणखी लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने नवोदय विद्यालय स्कूलमध्ये (एनवीएस) कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढिव मेडिकल क्लेम देण्याची माहिती दिली होती. यानुसार प्राध्यापकांच्या मेडिकल क्लेमची मर्यादा 5000 वरुन वाढून 25 हजार रुपये करण्यात आलीय. तसेच सरकारी किंवा सीजीएचएस मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेतल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा मेडिकल क्लेमही करता येतो.
हेही वाचा :
7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान
7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Double Good News, पगारवाढीपाठोपाठ प्रमोशनही होणार
7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?
व्हिडीओ पाहा :
Central government going to implement 7th Pay Commission DA recommendation from 1 July 2021