1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, लागू होणार नवा नियम

ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे.

1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, लागू होणार नवा नियम
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 7:53 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक (Cheque) पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. (cheque payments positive pay system to come into effect 1 january )

या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे. या सिस्टमच्या माध्यमातून चेकला एसएमएस (SMS), मोबाइल अॅप (Mobile App), इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि एटीएम (ATM) द्वारे दिला जाऊ शकतं.

कशी काम करणार पॉझिटिव्ह पे सिस्टम ?

पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो धनादेश देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.

यानंतर चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणीदेखील केली जाईल. ज्यामध्ये काही त्रुटी असल्यास चेक सिस्टम तपासाण्यात येईल. जर यामध्ये काही गडबड झाली तर ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (CTS – Cheque Truncation System) त्याला अधोरेखित केलं जातं आणि तशी बँकेला महत्त्वाची माहिती पुरवली जाते.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास नियम लागू

50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात. (cheque payments positive pay system to come into effect 1 january )

इतर बातम्या – 

पैशाला पैसा जोडून मिळवा बक्कळ पैसा, ‘या’ 5 पद्धतीने करा गुंतवणूक

Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?

(cheque payments positive pay system to come into effect 1 january )

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.