सांगा कसे जगायचे?, एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयाने वाढले; कमर्शियल सिलेंडरचे दरही गगनाला

19 किलोवाल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 350.50 रुपयाने वाढली आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर 1103 रुपयांना मिळणार आहे.

सांगा कसे जगायचे?, एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयाने वाढले; कमर्शियल सिलेंडरचे दरही गगनाला
Domestic Cooking GasImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:07 AM

नवी दिल्ली : होळी आधीच देशभरातील जनतेचा रंगाचा बेरंग झाला आहे. आज सकाळीच घरगुती आणि कमर्शियल सिलिंडरचे दर महागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयाने महागले आहेत. तर कमर्शियल गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला आहे. महागाईने आधीच सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं असतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यामुळे सांगा कसे जगायचे? असा सवाल सामान्यांकडून होत आहे. तर महिन्याचं बजेट लावता लावता गृहिणींच्या नाकीनऊ येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोवाल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 350.50 रुपयाने वाढली आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर 1103 रुपयांना मिळणार आहे. नवीन दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. लोकल टॅक्समुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एका राज्यापेक्षा वेगळी असते. फ्यूल रिटेलर्स दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा करत असतात.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील किंमती काय?

मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आधी 1052.50 रुपये होती. आता हा सिलिंडर 1102.5 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत कर्मिशय गॅस सिलिंडर 1721 रुपयांना मिळत होता. तो आता 2071.5 रुपयांना मिळणार आहे.

हॉटेलात खाणं महागलं

यापूर्वी ऑय मार्केटिंग कंपन्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किंमती वाढवून ग्राहकांना मोठा झटका दिला होता. या कंपन्यांनी कमर्शियल गॅसच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, कमर्शियल गॅसच्या दरात वाढ जाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवण महागलं होतं. सामान्य लोकांच्या बजेटलाही कात्री लागली होती.

गेल्यावर्षी चारवेळा दरवाढ

ओएमसीने गेल्यावर्षी 6 जुलै रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. सिलिंडरच्या किंमतीत 153.5 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या वर्षी चार वेळा गॅसचे दर वाढवण्यात आले होते. ओएमसीने पहिल्यांदा मार्च 2022मध्ये 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर मे मध्ये 50 रुपये आणि 3.50 रुपयांची वाढ केली होती. जुलैमध्येही घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती.

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.